Maharashtra Employees Strike Saam TV
महाराष्ट्र

Employees Strike: राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आजपासून संपावर जाणार; सर्वसामान्यांची कामे खोळंबणार, मागण्या काय?

Maharashtra Employees Strike: जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

Satish Daud

Government Employees Strike

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना दुसरीकडे सरकारी कर्मचारी सुद्धा जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून (१४ डिसेंबर) राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च २०२३ मध्ये संपावर गेले होते. त्यावेळी सरकारने यावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारला (State Government) अहवाल देखील दिला होता.

मात्र, सरकारने याबाबत निर्णय न घेतल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर संघटनांच्या समन्वय समितीने १४ डिसेंबरपासून पुन्हा राज्यव्यापी संप करण्याची घोषणा केली होती. मंगळवारी (१२ डिसेंबर) सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुरात महामोर्चा देखील काढला होता.

सरकारी कर्मचाऱ्यांचं आक्रमक रुप पाहता राज्य शासनाने बुधवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले होते. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते.

यावेळी सुबोधकुमार समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर अभ्यास व्हायचा आहे. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सरकार जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्याचबरोबर संपाचा निर्णय स्थगित करण्याची विनंती देखील केली.

मात्र, सुकाणू समितीच्या बैठकीतच संपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संघटनांच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर संघटनाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. त्यात गुरूवारपासून संपावरजाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT