State government approves new women's colleges affiliated to SNDT Women's University. saam tv
महाराष्ट्र

शैक्षणिक क्षेत्रातील मोठी बातमी! राज्यातील ३८ महिला पदवी महाविद्यालयांना मंजुरी

38 New Degree Women Colleges Approved : महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, महाराष्ट्राने ३८ नवीन महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी अनेक महाविद्यालये एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असणार आहेत.

Bharat Jadhav

  • राज्यात एकूण ३८ नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली

  • २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थिनींना घराजवळच उच्च शिक्षणाची संधी मिळेल.

राज्यात प्राध्यापकपदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी २७ महिला पदवी महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. ही सर्व महाविद्यालये मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाशी संलग्न असणार आहेत.

राज्यात एकूण ३८ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागात ही महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थिनींना घराजवळच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत 'नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली' (एनसीपीएस) द्वारे विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

निकषांची पूर्तता करणाऱ्या ३८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमधील २७ महाविद्यालये एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असणार आहेत. तर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न ८ महाविद्यालयांनाही मान्यता मिळाली आहे. यासह जळगाव, अमरावती आणि छ. संभाजीनगर येथील प्रत्येकी एका महाविद्यालयालाही मंजुरी देण्यात आली आहे.

ही सर्व महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. या संबंधित संस्थांना 'इरादापत्र' देण्यात आलेत. दरम्यान या नव्या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातील. यात बीएस्सी (विज्ञान व तंत्रज्ञान), बीएस्सी (होम सायन्स), बीए (मानव विज्ञान) आणि बीकॉम (व्यवस्थापन) या अभ्यासक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करा; शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, VIDEO

​Nashik Crime: ८ तरुणींच्या लैंगिक शोषणानंतर धर्मांतर अन् बीफ खाण्याची सक्ती; नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना उघडकीस

Apurva Nemlekar Reception Photos: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या रिसेप्शनचे फोटो पाहिलात का?

लॅपटॉप समोर ठेवून करायचा लैंगिक अत्याचार, ७ महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही; भोंदू खरात प्रकरणात हादरावणारी माहिती उघड

SCROLL FOR NEXT