Maharashtra ST Bus NCMC Card Update AI Image
महाराष्ट्र

NCMC Card Update : राज्यातील महिलांना सरकारचं दिवाळी गिफ्ट, NCMC कार्डबाबत घेतला मोठा निर्णय

ST Bus NCMC Card Update News : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा! एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी महिलांना १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

Alisha Khedekar

  • एसटीने महिला प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीची मुदत वाढ

  • एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती आता १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार

  • यापूर्वी १ ऑक्टोबर २०२६ पासून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय होता

सूरज म्हसूरकर, मुंबई

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड बाळगणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड अद्याप तयार नसलेल्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ जानेवारी २०२७ पासून स्मार्ट कार्डची सक्ती लागू होणार असून, तोपर्यंत जुन्या पद्धतीनेच प्रवास सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

यापूर्वी १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये महिलांची कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अचानक स्मार्ट कार्डची सक्ती केल्यास अनेक पात्र महिलांना प्रवास सवलतीपासून वंचित राहावे लागू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते तसेच मंत्र्यांकडून या निर्णयाला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागण्यांचा विचार करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याची मुदत १ जानेवारी २०२७ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी महामंडळाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख स्मार्ट कार्डांची नोंदणी आणि वितरण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित पात्र महिलांपर्यंत कार्ड पोहोचविण्याचे आव्हान कायम आहे. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करून कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या स्मार्ट कार्ड नसलेल्या महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. मात्र, भविष्यात प्रवास सवलतीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या मुदतीत एनसीएमसी कार्डची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : डायबिटीजमध्ये वांगी खाणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? जाणून घ्या

OBC Creamy Layer: OBC क्रिमी लेयरबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला मोठा झटका

Foot Massage: रात्री पायाच्या तळव्याला लावा फक्त एक चमचा तूप; मिळतील आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; बॉम्बे हायकोर्टासह अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य

BDD Homes : बीडीडी चाळीतील रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण; ५५७ कुटुंबांना मिळाली हक्काची घरे

SCROLL FOR NEXT