Ananda Shidha Saam Tv
महाराष्ट्र

Anandacha Shidha: गौरी- गणपतीचा सण 'गोड' होणार! १ कोटी ७० लाख कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा; विधानसभेआधी सरकारचं गिफ्ट

Maharashtra Politics Latest News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्य सरकार कामाला लागले असून विविध योजनांचा प्रचार जोरदार सुरू आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. २८ जुलै २०२४

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गणेशोत्सवात राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटला जाणार असून आचारसंहितेआधी सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्य सरकार कामाला लागले असून विविध योजनांचा प्रचार जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गणेशोत्सवात राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे.

७ सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला वेग आला आहे.

या टेंडर प्रक्रियेतील अटी आणि शर्थी शिथील केल्याने यावेळी ९ कंपन्यांचा टेंडर प्रक्रियेत सहभाग होणार आहे. यापूर्वी केवळ दोन ते तीन कंपन्या यामध्ये सहभागी होत होत्या. दरम्यान, आनंदाचा शिधा हा निकृष्ट दर्जाचा आणि खूप उशिरा वितरीत होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसंच विरोधकांकडून आरोप झाले होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर यावेळी असे प्रकार घडू नयेत याची काळजी सरकार घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT