Maharashtra Railway Budget 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Railway Budget : रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १३ हजार कोटींचा निधी; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी आणि रेल्वेच्या इतर कामांसाठी १३ हजार ५३९ कोटींचा निधी दिला आहे.

Shivaji Kale

Railway Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. अर्थसंकल्पात त्यांनी महाराष्ट्रासाठीही मोठी घोषणा केली. राज्याच्या रेल्वे विकासासाठी १३ हजार ५३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

यामध्ये मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे १६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर भुसावळ रेल्वे विभागासाठी १४७०.९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती टक्के रक्कम मिळेल, रेल्वेप्रकल्प राज्यात येतील याची अनेकांना उत्सुकता होती.

दरम्यान, आता केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी आणि रेल्वेच्या इतर कामांसाठी १३ हजार ५३९ कोटींचा निधी दिला आहे. हा निधी महाराष्ट्राला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा निधी असल्याचं केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकारपरिषद घेत ही माहिती दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटींचा निधी महाराष्ट्राला दिला आहे. वर्ष २००९ ते २०१४ या दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्रासाठी ११७० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी यंदा मोठी तरतूद आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकासाठी किती निधी?

जालना : १७० कोटी

नागपूर : ५८९ कोटी

औरंगाबाद : ३८० कोटी

ठाणे : ८०० कोटी

मुंबई सेंट्रल : ८५०

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल : १८१३ कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

SCROLL FOR NEXT