संजय गडदे/अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. 5 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभरात करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्याने 71 औषध विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर 29 परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. FDA च्या औषध विभागाने या दोन आठवड्यांच्या कालावधीत राज्यभरात एकूण ९३७ तपासण्या केल्या. या तपासण्यांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्याने संबंधितांना ४५० नोटिसा बजावण्यात आल्या. औषधांची गुणवत्ता आणि विक्रीसंदर्भातील नियमांचे पालन होते की नाही, याचीही तपासणी करण्यात आली.
तर सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व ओषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे अॅक्शनमोडवर आले आहेत. नाशिकमध्ये अन्न व ओषध प्रशासनाने मसाला उत्पादकावर मोठी कारवाई केली आहे. तिगरानिया औद्योगिक क्षेत्र परिसरातील मे. सोमेश्वर घरगुती मसाले या आस्थापनेवर छापा टाकून तब्बल 2 हजार 230 किलो मसाला जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मसाल्यांची एकूण किंमत 11 लाख 64 हजार रुपये असल्याची माहिती आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमवर अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मसालयांच्या पॅकिंग आणि लेबलिंगमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असून, चुकीचे लेबलिंग आणि लेबललिंगविषयक तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या मसाल्यांमध्ये हळद पावडर, कांदा-लसूण मसाला, धणे पावडर, गरम मसाला, स्पेशल मिक्स काळा मसाला, काळा मसाला आणि मिरची पावडर यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.