Maharashtra Farmer  Saam Tv
महाराष्ट्र

Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या चौथ्या यादीत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ?

Maharashtra Government : महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme: महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत चौथी यादी करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकापेक्षा जास्त बँकांमध्ये पीककर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाणार आहे.

आतापर्यंत १३,२७५ कोटी रुपयांची कर्जमाफी

सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १३,२७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. या योजनेत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीककर्ज आणि पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांचा समावेश?

चौथ्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्वाधिक १७,४८४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या १६,२४६, जालना जिल्ह्यातल्या १२,९२६ आणि अहिल्यानगर जिल्हातल्या ११,२७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातल्या ८,४८४, तर यवतमाळ जिल्ह्यातल्या ६,१०४ शेतकऱ्यांना या यादीत स्थान मिळाले आहे.

इतर जिल्ह्यांतील लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

बीड – ४,७९१

सातारा – ४,२८६

नांदेड – ४,१६१

परभणी – २,९८६

सोलापूर – २९७

गडचिरोली – २१६

आधीच्या याद्यांमध्ये किती लाभार्थी?

शेतकरी याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत १६,९६,२०१, दुसऱ्या यादीत ४,१९,७३७ आणि तिसऱ्या यादीत ३,५१,१९२ पात्र लाभार्थ्यांचा समावेश होता. आता चौथ्या यादीत एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

चौथ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रोसेस पूर्ण झाली का, याची खात्री केली पाहिजे. कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यासाठी पात्रता आणि आवश्यक पडताळणी पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी किंवा सहकार विभागाशी संपर्क साधून पुढच्या प्रक्रियेची माहिती घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Safety : मुदत संपलेली औषधं घेताय? आरोग्यासाठी ठरू शकतं अत्यंत धोकादायक

Maharashtra News Live Update: टोरंट पावर कंपनींसाठी ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड

Dengue Prevention Tips: डेंग्यूच्या विळख्यापासून राहायचे असेल दूर, तर अजिबात चुकू नका 'या' ५ महत्त्वाच्या टिप्स

Skin Care: नॅचरल ग्लो हवा? महागड्या ट्रीटमेंटऐवजी करून पाहा हा घरगुती उपाय

... तर आणखी एक मोठा अणुबॉम्ब फोडणार; मनोज जरांगेंच्या दाव्याने महायुतीत पुन्हा खळबळ

SCROLL FOR NEXT