bogus school  Saam tv
महाराष्ट्र

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

bogus school maharashtra : तुमच्या मुलांसाठी नवीन शाळा शोधतायत... तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे... राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट झालाय...त्यामुळे साम टीव्हीनं या बोगस शाळांचा इन्व्हेस्टीगेशन करून पर्दाफाश केलाय. कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शाळा आहेत याची यादीच साम टीव्हीच्या हाती लागलीय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Suprim Maskar

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय आणि पालकांची आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झालीय.... मात्र तुम्ही ज्या शाळेत आपल्या मुलाचा प्रवेश घेताय, ती शाळा अधिकृत आहे का? कारण, राज्यातील बोगस आणि अनधिकृत शाळांची धक्कादायक यादी 'साम टीव्ही'च्या हाती लागलीय. राज्यात तब्बल 172 शाळा बोगस असल्याचं साम टिव्हीच्या इन्वेस्टिगेशनमध्ये समोर आलयं.. अनेक शिक्षण संस्था केवळ 'इरादापत्र' मिळताच शाळा सुरू करतात किंवा मान्यता नसताना शाळा दुसऱ्या जागेत स्थलांतरित करतात. त्यामुळे राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट कसा झालाय... पाहूयात...

मुंबई - 132

पालघर- 20

ठाणे- 18

नागपूर- 1

नाशिक- 1

साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं या प्रकरणात अधिक माहिती घेण्यासाठी थेट शिक्षण संचालकांना गाठलं... त्यावेळी या बोगस शाळांवर तब्बल 1 लाख रुपयांचा आणि त्यानंतर दररोज 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालकांनी दिली....एवढंच नाही, तर बोगस शाळांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही आता थेट कारवाई होणार आहे.

पालकांनी मुलांचा शाळेत प्रवेश घेतना काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहूयात.

शिक्षणाधिकारी कार्यालयाद्वारे वर्षातून दोनदा अनधिकृत शाळांची अद्ययावत यादी वृत्तपत्रे, शासकीय संकेतस्थळे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाते. ही यादी पालकांनी वेळोवेळी तपासावी..सर्व अधिकृत आणि मान्यताप्राप्त शाळांनी त्यांच्या प्रवेशद्वारावर किंवा मुख्य इमारतीवर त्यांचा शासकीय मान्यता क्रमांक, UDISE क्रमांक आणि बोर्डाचे संलग्नता प्रमाणपत्र क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करणं बंधनकारक असतं..

त्यामुळे ही माहिती संस्थाचालकांक़डून मागावी आणि त्यानंतरच शाळेत प्रवेश घ्यावा.. त्याशिवाय शाळेच्या परिसराजवळ 'सदर शाळा अनधिकृत आहे' असा इशारा देणारा फलक शासनातर्फे लावला जाणार आहे. ज्यामुळे शाळा बोगस असल्यास कुठल्याही प्रलोभनाला न भुलता पाल्यांचा प्रवेश घेणं टाळावं..

दरम्यान साम टिव्हीच्या प्रतिनिधींनी बोगस शाळांच्या संस्थाचालकांची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केलाय...मात्र अनेकांनी यावर बोलण्यास नकार दिला.

दुसरीकडे जर एखादी बोगस शाळा बंद झाली, तर तिथल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना तातडीने नजीकच्या शासकीय किंवा मान्यताप्राप्त शाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. मात्र पालकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या आणि मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शाळा चालकांना कुणाचं अभय आहे? दरवर्षी बोगस शाळांच्या याद्या जाहीर करूनही त्याच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही? फक्त कारवाईच्या आदेशाचे कागदी घोडे नाचवले जातात का? मात्र या बोगस शाळांवर जो पर्यंत प्रत्यक्षात कारवाई होत नाही तोपर्यंत साम टीव्ही याचा पाठपुरावा करतच राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT