Maharashtra Police Seize ₹1 Crore Fake Notes From Miraj Tea Shop, Havaladar Arrested Saam Tv
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त, पोलिसानंच छापल्या 1 कोटीच्या नोटा

Fake Currency Factory: आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आलाय. चक्क एका चहाच्या दुकानात नोटा छापल्या जात होत्या. आणि धक्कादायक बाब म्हणजे एक हवालदार हे सगळे काळे धंदे करत होता.

Girish Nikam

सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा... अगदी देवाचं नाव असलेल्या या चहाच्या दुकानाकडे कोणाचीही पाऊले वळतील...मात्र रुईकर कॉलनीतल्या दुकानाआडून इथं चक्क बनावट नोटा छापल्या जात होत्या. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं वातावरण असताना पश्चिम महाराष्ट्रात पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणत मिरजमध्ये सुमारे 1 कोटींच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्यात. धक्कादायक बाब म्हणजे हा छापखाना कोल्हापूर पोलिस दलातील एक हवालदारच चालवत होता.

इब्रार इनामदार हा हवालदार कोल्हापुरात बनावट नोटा छापून त्याची तस्करी करत होता. पाचशे रुपयांच्या तीन बनावट नोटांच्या बदल्यात इनामदार पाचशे रुपये घेत होता. मिरज मधल्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी त्याचे कारनामे उघडकीस आणले. पुणे-बंगळूर महामार्गावरील कासेगाव येथून एका इन्व्होवा कारसह बनावट नोटा जप्त केल्या. या घटनेनंतर पोलिस दलातून इब्रार इनामदार निलंबीत करण्यात आले आहे.

अटक झालेल्या पाच जणांपैकी एक जण मुंबईतील आहे, तर चारजण कोल्हापूरमधील आहेत. या रॅकेटचं मुंबई कनेक्शन देखील तपासलं जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडल्याने पोलिस यंत्रणा संतर्क झाली आहे. या रॅकेटची पाळमुळं खणून काढणं हे आता पोलीसांसमोरचं मोठं आव्हान असेल,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरंधा घाटात दुचाकीचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

Kidney Detox Drinks: वेट लॉस ते किडनी Detox; 'या' भाज्याचं ज्यूस प्या, तब्येत राहिल फिट, आजार छुमंतर

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी दिसतात 'हे' संकेत; सामान्य लक्षणं समजण्याची चूक करू नका

Accidnet News : सोलापुरात भीषण अपघात! २५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल, डिव्हायडर तोडला अन्...

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

SCROLL FOR NEXT