राहुल नार्वेकर यांची ७ कोटी १७ लाख तर पत्नीच्या नावे ८ कोटी ५३ लाखांची जंगम मालमत्ता
राहुल नार्वेकर यांच्या नावे जवळपास २८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर पत्नीच्या नावे ८५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता
राहुल नार्वेकर यांच्यावर १७ कोटी रुपयांचे कर्ज तर ६६ कोटी रुपयांचे कर्ज पत्नीवर देखील
राहुल नार्वेकरांचे चार चारचाकी गाड्या, ज्यात मर्सिडीज बेंझ, इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा एक्ययूव्ही आणि फाॅर्च्युनरचा समावेश
राहुल नार्वेकर यांच्याकडे १६० ग्राम सोनं, ज्यांची किंमत जवळपास ११ लाख ६८ हजार रुपये
पत्नीकडे जवळपास ६६० ग्राम सोनं असून ज्याची किंमत ४८ लाखांच्या घरात आहे.
वसमत सह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे, ८ वाजून 57 मिनिटांनी या भागातील जमीन हादरली आहे, यापूर्वी देखील या भागात भूकंप झालेला होता. दरम्यान प्रशासकीय पातळीवर भूकंपाची सखोल माहिती घेणे सुरू आहे, थोड्या वेळात सविस्तर देतोय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23 वी ऊस परिषद आज कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावरती पार पडली आहे. या परिषदेला महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी दाखल झालेत. या परिषदेत राजू शेट्टींनी कारखानदारांना इशारा दिलाय तर चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एक रकमी एफआरपी सह 3700 रुपये प्रति टन पहिली उचल द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कारखानदारांनी ही मागणी मान्य केली नाही तर निवडणुका झाल्यानंतर स्वाभिमानी स्टाईल ने हिसका दाखवण्यात येईल असा दम शेट्टीने जाहीर ऊस परिषदेत दिला आहे. तसंच गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी तातडीने दोनशे रुपये चा हप्ता द्यावा यासह नऊ प्रमुख ठराव या ऊस परिषदेत करण्यात आले आहेत.
नांदगाव-मनमाड मतदारसंघात दूषित असलेले वातावरण बदलण्यासाठी उमेदवारीची घोषणा काल माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. या घोषणेनंतर त्यांच्या उमेदवारीला सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे. आज मनमाड येथील कार्यालयात नगरसेवक संजय निकम, नगरसेवक संतोष अहिरे, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार यांनी समीर भुजबळ यांची भेट घेत जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी भयमुक्त नांदगाव आणि नांदगावच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भुजबळ यांना पाठींबा देत असल्याचे सर्व नगरसेवकांनी सांगितले.
CEC बैठकीनंतर महाराष्ट् काँग्रेसच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक सुरू झालीय. दरम्यान काँग्रेसच्या केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत आज ४३ जागांवर चर्चा झालीय. त्यातील २५ जागांवर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालाय. आता यापुढे CEC ची दिल्लीत बैठक होणार नाहीये. पुढील दोन दिवसात काँग्रेसची ऑनलाईन सीईसीची बैठक होणार असून या बैठकीत उर्वरीत जागांवर निर्णय होणार आहे.
मनसेने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. या चौथ्या यादीत पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय. आतापर्यंत एकूण 70 उमेदवार मनसेचे जाहीर करण्यात आली आहेत.
घाटकोपरवरून चेंबूरच्या दिशेने येणाऱ्या कारमध्ये लाखो रुपयांची रक्कम आढळून आलीय.
कारमध्ये तीन व्यक्ती लाखोंची रोख रक्कम घेऊन जात होते. यावेळी एमजी रोडवर पेस्तम सागर येथील चेक पोस्टवर तपासणी केली असता हे लाखो रुपये पथकाला आढळले. पैसे आणि कार घेऊन पथक टिळक नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेत.
आज रात्री १० नंतर शिंदेच्या शिवसेनेची दुसरी यादी येण्याची शक्यता. पहिल्या यादीत ४५ जणांची नाव तर या यादीत कोणला मिळते संधी तर कोणाचा पत्ता होतो कट हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांनाही आता विरोध होऊ लागलेला आहे. अहेरी महायुती मध्ये गटाकडून सीट सुटलेली आहे. आता त्या ठिकाणी राजे अमरीशराव आत्राम यांना भाजप कडून उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही राजीनामा देऊ अशा पद्धतीची भूमिका अहेरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राहुल मोटे परांडा विधानसभेसाठी रिंगणात उतरल्याने परंडा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीत पेच निर्माण झालाय. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म राहुल मोटेनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संभ्रम निर्माण झालाय.
श्रीगोद्याच्या जागेवरील उमेदवाराची अद्याप महाविकास आघाडीकडून घोषणा करण्यात आली नाहीये. उमेदवारीवरून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. श्रीगोंद्यातील उमेदवाराची राष्ट्रवादी काँग्रेस आज घोषणा करणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना शिवसेनेने एबी फॅार्म दिल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतून महाविकास आघाडीत आलेल्या नागवडे यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीचा विरोध आहे.
बीडच्या आष्टी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शेख मेहबूब यांना उमेदवारी जाहीर करताच आता येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जातोय.. येथील माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह दीडशे पदाधिकाऱ्यांनी आता पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे साहेबराव दरेकर यांनी म्हटले आहे.
मला जयंत पाटील व बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत तुमची उमेदवारी फायनल आहे असा शब्द दिला होता परंतु मी परत आष्टी येथे येताच पाठीमागे शेख मेहबूब यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली यामुळे आता आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचं साहेबराव दरेकर यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांना माझगांव सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा
मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात शिक्षेला स्थगिती
त्याच बरोबर या प्रकरणात राऊत यांना जामीन मंजूर
50 हजाराच्या जात मुचलयक्यावर जामीन मंजूर
मात्र पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 रोजी होणार
ज्या जागांवर एकमत झालं नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार
५-७ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता
कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन मैत्रीपूर्ण लढत होणार
सूत्रांची माहिती
खेड आळंदी विधानसभा मतदार संघात महायुतीत बंडखोरी..?
महायुतीची उमेदवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहितेपाटीलांना जाहिर झाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेकडुन बंडखोरीची शक्यता..
अक्षय जाधव यांच्या बंडोखोरीने खेड आळंदी विधानसभाटेत महायुतीला धक्का..
शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव शक्तीप्रदर्शन करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
चाकण ते राजगुरुनगर अशी शक्तीप्रदर्शन करत निघाली रँली
पुणे नाशिक महामार्गावर वाहतुककोंडी
काँग्रेस पक्षाच्या वतीने माध्यम समन्वयकाची नियुक्ती
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नियुक्ती
मुंबई - सुरेंद्र राजपूत
छत्रपती संभाजीनगर - महिमा सिंग
पुणे - डॉ. शमा मोहम्मद
दिवस आणि आपला बाकीचा देखील वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे लक्ष्मीपूजन असता त्या सगळ्या गोष्टी असतात आज मला मामांनी सांगितले दादा फॉर्म भरायला यावेळेस राज्य उद्याच्या पाच वर्षाच्या करता कुणाच्या हातामध्ये द्यायचं हा निर्णय शिवाजी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला घ्यायचा आहे.
रविवार ते सगळं काम संपेल आणि संपूर्ण चित्र स्पष्ट होईल की ते उमेदवार राहतील का राहतील लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल मी आत्ता काही बोलू इच्छित नाही. एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि बाकीच्या आमच्या आरपीआय इतर घटक पक्ष सगळेजण मिळून सगळ्यांना आम्ही समाधानी उमेदवारीच्या बाबतीमध्ये करू शकत नाही पण एकंदरीतच जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रात ना माझ्या महायुती करता निवडून गेल्या पाहिजे.
आमदार हा आपले प्रश्न सोडवण्याच्या करता आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आता तुमच्या समोर जे काही चित्र आहे एकंदरीत आज मी महायुतीचे उमेदवार म्हणून दत्तामामा भरणे यांच्या घड्याळाच्या चित्राच्या जवळच बटन आपण उद्याच्या 20 तारखेला दाबावं ही विनंती करण्याच्या करता माय माऊलीचा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे.
सांगोला तालुक्यातील एका वाहनात 5 कोटी रक्कम खेड शिवापूर येथे सापडली होती. त्याचा संबंध खासदार संजय राऊत यांनी सांगोला आमदार शहाजी पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी लावला होता. आता सांगोला शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी जाहीर सभेत गाडीची चर्चा करू नका त्यासाठी ठाण्याची दाढी आमच्या सोबत आहे. असे म्हणत या प्रकरणात ठाण्याचा आशीर्वाद आहे याचे संकेत दिले आहेत.
दादासाहेब लवटे यांनी आज सांगोला तालुक्यातील चिक महुद या गावात आमदार शहाजी पाटील यांनी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी लवटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून या 5 कोटी रुपयांच्या रकमेशी कोणाशी संबंध आहे याचं रोख सांगितला आहे
पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी जप्त केले १३८ कोटीचे सोने
पुण्यातील सहकारनगर भागात नाका बंदी असताना पोलिसांनी जप्त केलं सोनं
पोलिसांनी या संदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला माहिती कळवली आहे
एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा सण गोड होणार आहे.
माढ्यात महायुतीमध्ये उमेदवारीचा तिढा कायम....
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी माढ्याची जागा शिवसेनाला सोडण्याची केली मागणी....
माढ्याची अजित पवार गटाकडे आहे.
अजित गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचा अजित पवार गटातून निवडणूक लढण्यास नकार...
माढ्यात अजित पवार गट सक्षम उमेदवाराच्या शोधात.....
शिवसेनेला जागा दिल्यास शिवसेना ही जागा ताकदीने लढवू जिंकू जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांची माहिती ....
फक्त देशाला माहिती आहे मी ठाकरेंचा निष्ठावंत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे यासाठी मी प्रयत्न केले होते. दुर्दैवाने झाले नाही. पण भविष्यात ते एकत्र येणार हे मात्र नक्की, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
गेल्या दहा वर्षात नागपूरात एक लाख कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे केले. चांगले रस्ते झाले, 70 टक्के नागपुरकरांना पिण्याचा स्वच्छ पाणी मिळतो आहे. माझ्यामुळे फडणवीस किंवा बावनकुळे मुळे नाही तर तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे झाला आहे.
आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता असली पिक्चर तो अभी बाकी है. आम्ही मिहान मध्ये ७८००० स्थानिक तरुणांना नोकरी दिली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या मुलाबाळांना उमेदवारी देण्याची चिंता आहे आम्ही गोरगरिबांच्या मुलांना नोकरी मिळवून देत आहोत.पुन्हा एकदा सत्तेची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आले, देवेंद्र फडणवीस बावनकुळे सारखे लोक सत्तेत गेले, ते पुन्हा चांगले काम करून दाखवतील.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपमधील राजकारण ढवळून निघाले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारीसाठी नकार दिल्यावर जोरगेवार यांनी भाजपच्या तिकिटासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यांना ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा भक्कम पाठिंबा असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे, जोरगेवार यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवाय मुनगंटीवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते आज शेकडोच्या संख्येने नागपूरला निघाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हे कार्यकर्ते जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध करणार आहेत.
परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.यावेळी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती 53.80 कोटी असल्याचे नमूद केले आहे. 2019 साली मुंडे यांची संपत्ती 23 कोटी इतकी होती. या मध्ये धनंजय मुंडे यांच्या नावावर 15 कोटीं 55 लाख 5 हजार 105 रुपयांची विविध वाहने आहेत.यामध्ये बुलेट पासून टँकर पर्यंत एकूण 7 वाहनांचा समावेश आहे तर 7 लाख 3000 रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे.त्यांच्या पत्नीच्या नावे 31 लाख 78 हजार 675 रुपयांची दोन वाहने आहेत.याबरोबर 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने व 72 हजारांची दीड किलो चांदीचा समावेश आहे.
मी रोज बोलतो आज फार बोलत आहे,
आपलं काम कोणतं हे सर्वांना माहीत आहे.( बोलत नाही करतो)
हा बदल लोक डोळ्यान पाहत आहे,
आज नागपूरचा चेहरा मोहरा बदलला आहे.
साडे सात वर्षात काम बघा आणि यापूर्वी काँग्रेसच काम बघा..
गोसीखुर्द असेल समवृद्धी असेल काम झाले आहे...
पंतप्रधान यांच्या पावलावर नवं भारताची निर्मिती सोबत नवं महाराष्ट्र निर्मिती सुरू केली आहे..
विरोधकांवर बोलणार नाही, त्यासाठी लाडक्या बहिणी बोलण्यासाठी पुरेशया आहे..
आज काम बोलत आहे,
Obc साठी 48 जीआर काढणारे महायुती सरकार आहे,
ओबीसींचे एक हॉस्टेल विरोधक तयार करू शकले नाही,
मनसेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे आज भरणार उमेदवारी अर्ज
रॅली न काढता मेट्रोने जात भरणार उमेदवारी अर्ज
काल चंद्रकांत पाटलांनी काढली होती रॅली
कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती वाहतूक कोंडी
पुणेकरांना त्रास होऊ नये म्हणून किशोर शिंदेमेट्रो ने जात भरणार उमेदवारी अर्ज
मनसे कोथरूड मधून किशोर शिंदे हे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
महायुतीच्या नेत्यांना माझी विनंती आहे तिकीट कोणालाच देवू नका, आम्ही तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहोत, तेव्हा तिघांना अपक्ष उभा करा, जे होईल ते पाहू. असं भाजपाचे माजी मंत्री सुरेश धस यांनी जाहीर भाषणातून वक्तव्य केलं आहे.. विशेष म्हणजे बीडमध्ये निवडणूक लढवायचे म्हटलं की अंगावर काटा येतोय.. असा देखील सुरेश धस म्हणाले आहेत. त्याचबरोबर उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने धस समर्थक आक्रमक झाले आहेत.. तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरला जात आहे..यावेळी कार्यकर्त्यांनी आष्टी येथील निवासस्थानाच्या समोर घोषणाबाजी केलीय, तर यावेळी सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढताना असं वक्तव्य केलं..
नाशकात महाविकास आघाडीत मिठाचा खडा
- नाशिक मध्य विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याने काँग्रेसमध्ये नाराजी
- पक्षश्रेष्ठींनी मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढणारचं
- काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि प्रवक्त्या हेमलता पाटील यांची भूमिका
- नाशिकमध्ये काँग्रेसचा पंजा आणि आस्तित्व टिकवण्यासाठी माझी लढाई
- पक्षातील नेत्यांनी नाशिक मध्यची जागा सोडायला नको होती
- काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर हेमलता पाटील यांची उघड नाराजी
- महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडू नये, याचा विचार वरिष्ठ नेत्यांनी करावा, हेमलता पाटील यांची आक्रमक भूमिका
- दरम्यान हेमलता पाटील यांच्याशी बातचीत केलीय, आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला...मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी अर्ज भरला... शेवगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, गोपीनाथ मुंडे आणि गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांनी रॅली काढून जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णायक अधिकारी प्रसाद मते यांच्याकडे दाखल केला.
हर्षदा काकडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार असून ही निवडणूक आता मोठ्या चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे हर्षदा काकडे या स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये काम करत होत्या मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या भाजप पासून अलिप्त झाल्या होत्या आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीचे उमेदवार मोनिका राजळे यांच्या पुढे एक मोठे आव्हान हर्षदा काकडे यांच्या रूपाने उभा राहिले आहे.
महायुतीच्या नेत्यांना माझी विनंती आहे तिकीट कोणालाच देवू नका, आम्ही तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहोत, तेव्हा तिघांना अपक्ष उभा करा, जे होईल ते पाहू. असं भाजपाचे माजी मंत्री सुरेश धस यांनी जाहीर भाषणातून वक्तव्य केलं आहे..
माझ्यातील 10 टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देणार आहे..आम्हाला सगळ्यांना सोबत घायचं आहे.अजित पवार
कोल्हापूर उत्तर हा मतदार संघ शिवसेनेला सुटलेला आहे. राज्यामध्ये महायुतीत काही जणांमुळे दुफळी निर्माण होत आहे. महायुतीत काहीतरी चुकतंय, महायुतीतील सर्वच घटकांनी आपला उमेदवार डॅमेज होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक आणि धैर्यशील माने याना देखील महायुतीतील याच घटकांनी डॅमेज केले आहे.भाजपाचे खासदार धनंजय महाडिक सध्या आपल्या मुलासाठी कोल्हापूर उत्तर मधून तिकीट मागत आहेत.धनंजय महाडिक यांच्या या कृतीमुळे भाजपची दक्षिण मधील सीट आता डॅमेज होऊ लागलेली आहे. लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि उत्तर मतदार संघाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केलेली आहे. 2019 ला युतीतला वाद हा माझ्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेला आहे. असेही राजेश क्षीरसागर म्हणालेत.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपमधील राजकारण ढवळून निघाले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारीसाठी नकार दिल्यावर जोरगेवार यांनी भाजपच्या तिकिटासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यांना ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा भक्कम पाठिंबा असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे, जोरगेवार यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवाय मुनगंटीवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते आज शेकडोच्या संख्येने नागपूरला निघाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हे कार्यकर्ते जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध करणार आहेत.
इंडिगो एअरलाइनच्या 20 विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी..
ई-मेलवरून अज्ञाताने दिली धमकी..
सलग दुसऱ्या दिवशी पुणे एअरपोर्ट वरील विमानांना उडून देण्याची धमकी..
काल ११ विमानांना धमकी दिल्यानंतर आज पुन्हा 20 विमानांना उडून देण्याची धमकी..
इंडिगो कंपनीच्या सह इतर कंपन्यांना धमकी मिळत असताना हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्याचं 600 कोटी रुपयांचं नुकसान
प्रवासी विमानांना धमकी येण्याची सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण..
विमानतळ हाय अलर्ट वर.. विमान उडून देण्याच्या धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले आहे. आपला मुलगा यावेळी ही शंभर टक्के निवडून येईल असा विश्वास त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेला आहे. याविषयी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे याच्याशी केलेली बातचीत
उल्हासनगरात भररस्त्यात एका इसमाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. कॅम्प ५ मधील माहेश्वरी हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.
एकत्रित सर्व जागावाटप उमेदवार समोर आलेलं आहे. या घोटाळेबाज टक्केवारी सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही मैदानात आहोतअंबादास दानवे
Maharashtra Marathi News Live Updates : कसबा मतदार संघात कॅाग्रेसमध्ये बंडाचा झेंडा. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी महापौर कमल व्यवहारे यांचा कॅाग्रेसचा राजीनामा
शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही
आमच्या भाषेत वृत्तपत्राच्या एडिट झाल्यानंतर थोडासा एडिट होऊ शकतात नावात जागेत होऊ शकतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एखाद दुसरा जागेवर पुन्हा चर्चा होईल.
रामटेकची जागा शिवसेनेचे विद्यमान आमदार, सांगोलाच्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान आमदार तिथे निर्णय आम्ही घेणार काय करायचे.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी काल रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती.
खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी देण्यासाठी भेट झाल्याची माहिती.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जागा मुलगा कृष्णराज महाडिक याला मिळावी म्हणून खासदार धनंजय महाडिकांची फिल्डिंग
कृष्णराज महाडिक हातात शिवधनुष्य घेण्याची शक्यता.
कालरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती
तर आज शिवसेनेची दुसरी यादी येण्याची शक्यता.
पुणे जिल्ह्यातील वाघोली शहरांमध्ये जुन्या भाडळे वस्ती डिकॅथलॉन शेजारी भर लोक वस्तीमध्ये बिबट्याचा वावर सुरु.
चार दिवसांपूर्वीच मेंढपाळाच्या कळपावर हल्ला.
या हल्यात मेंढीचे एक पिल्लू फस्त करून मोठ्या मेंढी वरती केला गेला होता हल्ला.
या परिसरामध्ये भर लोकवस्ती असून बाजूलाच अंगणवाडी शाळा आहे या शाळेतील लहान मुले जीवितास धोका आहे.
या परिसरामध्ये रहिवाशांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी केली होती मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असून मोठी दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावणार का असा येथील रहिवाशांनी आरोप केला आहे .
कसब्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पदाधिकाऱ्यांची नाराजी
पक्षाला धरून रवींद्र दंगेकर काम करत नसल्याचा ठपका ठेवत कमल व्यवहारे स्वराज्य पक्षाच्या वाटेवर
पुण्यातून कॉंग्रेस ला मोठा धक्का बसणार ,
कसबा विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे स्वराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार
कॉंग्रेसच्या माजी महापौर महिला प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे ‘संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्ष' च्या वाटेवर कसबा मतदार संघात स्वराज्य पक्षा कडून लढाणार ?
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे ,यांची स्वराज्य भवन पुणे कार्यालयात भेट घेतली.
कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार कसबे चे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात मोठी नाराजी
'परिवर्तन महाशक्ती' च्या आणखी २८ जागांची निश्चीती,स्वराज्य पक्ष व प्रहार पक्ष आजच आपआपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार
पुणे : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 'परिवर्तन महाशक्ती' ची स्थापना करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष व समविचारी नेत्यांनी एकत्र येवून राज्यातील जनतेला सक्षम पर्याय दिला आहे.
'परिवर्तन महाशक्ती' मधील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती च्या २८ जागांची निश्चिती झाली आहे तर लवकरच स्वाभिमानी पक्षाच्या देखील जागांची घोषणा करण्यात येणार आहे,
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सिटी रवी यांनी घेतली मधुकर मुसळे यांची भेट
मुसळे यांची नाराजी दूर करण्याचा केला प्रयत्न...
मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मधुकर मुसळे यांचा स्पष्ट नकार.
मधुकर मुसळे यांनी भरलाय शिवाजीनगर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज
भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मधुकर मुसळे यांची मनधरणी करण्यासाठी महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी सि टी रवी यांचे प्रयत्न अयशस्वी.
नागरिकांच्या सेवेसाठी त्यांच्या भावनेनुसार जिंकण्यासाठी लढणार
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूर विधानसभेची उमेदवारी अर्ज दाखल करणार
आमदार अमोल मिटकरी, तसेच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार
शक्ती प्रदर्शन करत दत्ता भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार
काल सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला होता दाखल
खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा असलेल्या बंदद्वार कक्षाला आग लागली. त्यामध्ये उपलब्ध औषधसाठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आग विझविण्याचे कुठलेही यंत्र सामुग्री नसल्याने आगीने रुद्र रूप धरण केले होते तसेच अग्निशमन येऊच शकले नसल्याने या आरोग्य केंद्रातील औषध साठा जळून खाक झाला आहे.. ही आग स्थानी नागरिकानी विझविली... प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. इमारतीमध्ये विद्युत फिटिंग ही फार जुनी असल्याने आग लागल्याचे समजते.. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पूर्णत दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे...
राजेश बेंडल यांच्या प्रवेशानंतरही गुहागरमधील उमेदवारीवरून पुन्हा एकदा राजकीय खलबत सुरू झाल्यामुळे उमेदवारीचा सस्पेन्स वाढला.
रवींद्र फाटक यांच्यासह विपुल कदम यांच्याकडून गुहागरच्या शिवसैनिकांकडून गुरुवारी विभागवार गुप्त बैठका
भाजपचे इच्छुक उमेदवार डॉक्टर विनय नातू यांच्याशी देखील रवींद्र फाटक आणि विपुल कदम यांची भेट
अचानक सुरू झालेल्या भेटीगाठींमुळे विपुल कदमांच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा
गुहागरमधील शांताई हॉटेलमध्ये झाल्या बैठका
भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा आज राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत आहेत. त्यांना इस्लामपूर येथे तुतारीचे जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवारी मिळू शकते.
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील पक्ष प्रवेश होणार असून, त्यांना देखील मोर्शी येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.