State Election commission  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: राज्यातील लोकसभेच्या २ रिक्त जागांवर लवकरच पोटनिवडणूक होणार? आयोगाची तयारी सुरू

Maharashtra Political News: राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामुळे लवकरच या मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता बळावली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur News: राज्यात खासदार गिरीश बापट आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यातील २ लोकसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. दोन खासदारांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक केव्हा लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामुळे लवकरच या मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता बळावली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास तयारी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक जुळवाजुळव सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता निवडणुकीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रात दिली आहे. या पत्रात ज्या साहित्याची गरज आहे, त्याचा तात्काळ आढावा घेऊन मागणी करण्याची सूचना आहे.

चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा 30 मे रोजी झाला मृत्यू होता. त्यामुळे रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच निवडणूक घ्यायची झाल्यास आयोगाने त्यासाठी तयारी केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून अनेकांची नावं चर्चेत आहेत. महाविकास आघाडीत पुणे लोकसभा निवडणुकीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला मिळते हे पाहावे लागेल.

भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अद्याप कोणत्याही नेत्यांची नावे चर्चेत आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT