State Election commission  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra : राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार; शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सांवत

Maharashtra MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक , अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद व कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारीला मतदान, तर २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. (Latest Marathi News)

राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. नाशिक , अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद व कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर झाली आहे. या मतदार संघात कोण बाजी मारणार, हे पाहावे लागणार आहे.

विधान परिषदेतील निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघ

विक्रम काळे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

रणजित पाटील, अमरावती पदवीधर मतदारसंघ

बाळाराम पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघ

नागो गाणार, नागपूर शिक्षक मतदार संघ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT