varsha gaikwad 
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या...

संदीप नागरे

हिंगाेली : काेविड १९ च्या तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सध्या तरी विचारधीन नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. हिंगाेलीत मंत्री गायकवाड यांनी माध्यमांशी बाेलताना शाळा करण्याबाबतच्या प्रश्नास उत्तर दिले. maharashtra-eductaion-minister-varsha-gaikwad-addressed-media-school-opening-sml80

मंत्री गायकवाड म्हणाल्या राज्य शासनाने जूलै महिन्यात ग्रामीण आणि शहरी भागात शाळा सुरु करण्याबाबत पावलं उचलली हाेती. परंतु तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर सध्या तरी आॅनलाईन शाळा सुरु ठेवल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, शिक्षण तज्ञ, एनजीआे यांच्याशी चर्चा करुन प्राप्त सूचनांचा प्रस्ताव तयार केला हाेती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तयार केलेला प्रस्ताव सादर केला हाेता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टास्क फाेर्सचा अभिप्राय घ्यावा असे सूचविले आहे. त्यादृष्टीने पावलं उचलली जात आहेत.

आता गणेशाेत्सव संपला आहे. या उत्सव काळात लाेक माेठ्या प्रमाणात एकत्र आलेले हाेते. त्यामुळे येत्या १५ दिवसांत समजेल नक्की काय काेविड १९ ची परिस्थिती आहे. त्यामुळे १५ दिवस तरी आपण थांबणार आहाेत. त्यानंतर परिस्थितीचा विचार करुन शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करुन निर्णय जाहीर करु असे मंत्री वर्षा गायकवाड varsha gaikwad यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT