Badlapur School Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra : आता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा, राज्य सरकारचा निर्णय, वाचा सविस्तर...

Maharashtra education policy : महाराष्ट्र शासनाने नवीन शालेय अभ्यासक्रम आराखड्यानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली आहे. आता सर्व शाळांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा शिकवाव्या लागणार आहेत.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Maharashtra Makes Hindi Compulsory : इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या निर्णायावर महाराष्ट्र सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अमलबजावणी करण्यात येणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. यामुळे मराठी भाषाबरोबरच हिंदीलाही प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या निर्णयाला भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर काही विरोधही होत आहे.

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. तसेच, अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकवण्यात येणार आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) ने पायाभूत व शालेय स्तरासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या आराखड्यांना मान्यता दिल्यानंतर शासनाने त्यावर शिक्कामोर्तब करत अंमलबजावणीची घोषणा केली आहे. आता शासन निर्णय जाहीर झाल्यामुळे हा नियम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून निश्चितपणे लागू होणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा शिकवणं सक्तीचे करण्यात आले आहे. याआधी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरीरी पासून हिंदी शिकवली जात होती. मात्र आता पहिली पासूनच हिंदीचा समावेश करण्यात आला आहे. या बदलाला अनुसरून पाठ्यपुस्तकेही महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक संदर्भानुसार सुधारित केली जात आहेत. बालभारतीच्या सहकार्याने ही पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Deleted Messages: व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट झालेले मेसेज वाचायचे आहेत? फक्त 'हे' स्टेप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Ajit Pawar News : काही लोक विकृत असतात, अजित पवारांनी आमदार सोनवणेंना सुनावले

Maharashtra Politics: मद्य घोटाळ्याचा आर्थिक कणा शिंदेंच्या फाउंडेशनचा! संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा – संजय राऊत|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार? ३००० रुपये या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT