School News Saam Tv
महाराष्ट्र

School News: पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप बसणार; शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Education Department Big Decision: शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता फक्त ख्रिश्चन समुदायाद्वारे संचलित शाळांनाच कॉन्व्हेंट शब्द लावता येणार आहे.

Siddhi Hande

शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

आता फक्त ख्रिश्चन समुदायाद्वारे संचलित शाळांनाच कॉन्व्हेंट शब्द लावता येणार

इतर शाळांना कॉन्व्हेंट शब्द वापरण्याची परवानगी नाही

पगार ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळांच्या नावाबाबतचा हा निर्णय आहे. आता फक्त ख्रिश्चन समुदायाद्वारे संचलित शाळांनाच कॉन्व्हेंट शब्द लावता येणार आहे. इतर शाळांना त्यांच्या नावापुढे कॉन्व्हेंट असा शब्द लावता येणार आहे. त्यामुळे अनेक शाळांना नाव बदलायला लागू शकतात.

फक्त आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाळांच्या नावाबाबत आणखी एक निर्णय झाला होता. फक्त आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न शाळांनाच युनिव्हर्सल, ग्लोबल, ऑक्सफर्ड सारख्या शब्दांचा वापर शाळेच्या नावात करता येईल. इतर शाळांना इंटरनॅशनल अशा पद्धतीच्या नावाचा उल्लेख करता येणार नाहीये.

अनेक खाजगी संस्था स्वयंअर्थसाहित तत्त्वावर शाळा सुरू करून पालकांना, विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. यासाठी शाळांच्या नावात आंतरराष्ट्रीय, ग्लोबल, वर्ड सैनिकी, ऑक्सफर्ड नावाचा वापर करतात.

यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होते. याबाबत आता शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून काही शब्दांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळेच आता फक्त मान्यता असणाऱ्या शाळांनाच कॉन्व्हेंट आणि इंटरनॅशन,ग्लोबल अशा शब्दांचा वापर करता येणार आहे. जर शाळांनी हा नियम पाळला नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

राज्यात अनेक शाळा या स्वयंअर्थ सहाय्यतेवर चालवल्या जातात. यामधील अनेक शाळांना आंतरराष्ट्रीय नावे दिले जातात. यामध्ये इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल स्कूल, वर्ल्ड स्कूल अशी नावे वापरली जातात. प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आणि सुविधा उपलब्ध नसतानाही या शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळेच राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन पालकांची फसवणूक होऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

Mumbai : मुंबईकरांना पाणीटंचाईची झळ बसणार? पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणात किती टक्के पाणीसाठा उरलाय? माहिती समोर

SCROLL FOR NEXT