MAHARASHTRA DROUGHT saam tv
महाराष्ट्र

दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकारची धावाधाव, राज्यात लवकरच दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Drought Declaration: दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं आता धावाधाव सुरू कैेलीय. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी काही मंत्र्यांनी लवकरच दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. कोणत्या मंत्र्यांनी संकेत दिले आहेत? आणि नेमकं सरकार काय हालचाली करतंय....

Rohit Kadam

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आलाय. राज्याच्या अनेक भागांत पावसानं ओढ दिल्यानं सध्या क्षेत्रीय पातळीवर मोठी तूट निर्माण झालीये. अशा ठिकाणी पहिली कळ अर्थात Trigger-1 लागू करण्यात आलीये. तर दुसरी कळ अर्थात Trigger-2 लागू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. एव्हंढच नव्हे तर पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा, जलाशयातील पाणीपातळी आणि उपग्रहाद्वारे मिळणारे NDVI डेटा तपासला जातोय. दरम्यान, दुष्काळ व्यवस्थापन संहिता काय सांगते? ते पाहूयात...

दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला वेग

दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्य शासनाला खरीप हंगामासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत तर रब्बी हंगामासाठी 21 मार्चपर्यंत दुष्काळ जाहीर करता येतो. त्यामुळे या कालमर्यादेतच अधिकृत घोषणा करणे बंधनकारक आहे. राज्याचे कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती कार्यरत आहे. या समितीचा सविस्तर अहवाल राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावरून दुष्काळ घोषित करण्याबाबत अंतिम कार्यवाही करण्यात येईल आणि शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. त्यानंतर NDRF/ SDRF निकषानुसार बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात येईल.

तर दुसरीकडे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर आढावा घेतला जातोय. सरकारकडून दुष्काळी भागाचं सर्वेक्षण करून लवकरच दुष्काळ जाहीर करण्याचे सुतोवाच सरकारनं केलंय...खरंतर, राज्यात दुष्काळी संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजा सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. तर दुसरीकडे, शेतकऱ्यांनी पंचनामे आणि ई-पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केलंय. मात्र, कागदोपत्री निकष आणि तांत्रिक त्रुटींमुळे काही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकार ताकडीनं दुष्काळ जाहीर करून राज्यातील बळीराजाला दिलासा देणार का... याकडे सगळ्यांंचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

हप्ता थकल्यावर आता फायनान्स कंपनीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

ऑनलाईन अन्नात आढळले जिवंत उंदीर अन् झुरळे; तुकाराम मुंढेंच्या FDA ची धाड, नामांकित स्टोअर्सचे परवाने रद्द

SCROLL FOR NEXT