Maharashtra Drought 139 Talukas Under First Trigger, Two-phase Declaration Likely saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर

Maharashtra Drought Update: : कृषी विभागाच्या अहवालानुसार १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू होण्यासारखी स्थिती आहे. दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्रात पावसाच्या तुटीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती

  • १३९ तालुक्यांमध्ये पहिल्या ट्रिगरची शक्यता.

  • जून ते सप्टेंबरमधील सरासरी पाऊस विचारात घेतला जातो.

राज्यातल्या दुष्काळावरून जोरदार राजकारण पेटलंय. मुख्यमंत्र्यांनी आता दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा जीआर काढण्याची तारीख बदलली असल्यानं विरोधकांकडून टीका केली जातेय. त्याचदरम्यान दुष्काळाबाबत नवी अपडेट आलीय. राज्यातील दुष्काळ दोन टप्प्यात जाहीर केला जाणार आहे. कृषी विभागाने हा अहवाल सरकारला सादर केलाय. दुसरीकडे, दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी या तालुक्यांची यादी ‘एमएनसीएफसी’ला (महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र) दिली आहे.

राज्यातील १३७ लाख हेक्टरपैकी सुमारे ९० लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली. पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडलाय. सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी स्थिती आहे.

दुष्काळाचा पहिला ट्रिगर म्हणजे काय?

पहिला ट्रिगर निश्चित करण्यासाठी जून ते सप्टेंबरमधील सरासरी पाऊस विचारात घेतला जातो. पर्जन्यमानाचे विचलन, पावसातील खंड व जून-जुलैमधील सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी लक्षात घेतलं जाते. यानुसार २७ जिल्ह्यांमधील १३९ तालुक्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त आहे. हलक्या जमिनीसाठी किमान २१ दिवसांचा आणि भारी जमिनीसाठी २८ दिवसांचा खंड विचारात घेतला जात असतो.

जिल्हानिहाय जमिनीचे वर्गीकरण करून त्यानुसार हलकी व भारी जमिनीतील खंड विचारात घेत तालुक्यांची संख्या निश्चित करावे लागेल असं ‘कृषी’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सात जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि १७५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्केसुद्धा पाऊस झाला नसल्याचे अहवालात म्हटलंय. या अहवालानुसार राज्यातील १७५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होऊ शकतो.

‘पहिल्या ट्रिगर’चे विभागीयनिहाय तालुके, येथे जाहीर होणार दुष्काळ

ठाणे विभाग :

ठाण्यातील कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ. रायगडमधील पनवेल, कर्जत, पेण. पालघर जिल्ह्यातील वडाळा डहाणू, तलासरी, विक्रमगड.

पुणे विभाग :

पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, वेल्हे, खेड, राजगुरूनगर, शिरूर घोडनदी, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर सासवड. सोलापुरातील बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिस, मंगळवेढा.

अहिल्यानगरमधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोला, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.

नाशिक विभाग :

नाशिकमधील इगतपुरी, मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, सिन्नर, येवला, देवळी. धुळ्यातील धुळे शिक्री, शिरपूर, शिंदखेडा. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अकराणी. जळगावमधील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, इदलाबाद, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, जामनेर, पाचोरा, भांडगाव, धरणगाव, बोधवाडा.

कोल्हापूर विभाग :

साताऱ्यातील पाटण, खटाव-वडूज, माण-दहिवडी, फलटण, खंडाळा. सांगलीतील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ. कोल्हापूरमधील चंदगड, राधानगरी.

छत्रपती संभाजीनगर विभाग :

छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, शिल्लोड, सोयगाव. जालन्यातील अंबड, परतूर, बदनापूर, घनसांगवी, मंठा. बीडमधील अष्टी, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, शिरूर कासार.

लातूर विभाग :

लातूरमधील रेनापूर, धाराशिवमधील धाराशिव, तुळजापूर, परांडा, भूम. परभणीतील पाथरी, मानवत.

अमरावती विभाग :

बुलढाण्यातील जळगाव जामोद, बुलढाणा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा. अकोल्यातील बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी. वाशिममधील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा. अमरावतीतील भातकुली, दर्यापूर. यवतमाळमधील दारवा.

नागपूर विभाग :

वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी. गोंदियातील तिरोडा, सेकसी. गडचिरोलीतील कुरखेडा, धानोरा व इटापल्ली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Fort : चार राजवटींच्या सत्तांतराचा साक्षीदार आहे नवी मुंबईतील 'हा' किल्ला

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT