Maharashtra district cooperative bank elections latest updates saam tv
महाराष्ट्र

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

District Bank Elections : आता बातमी आहे राजकीय आखाड्यातून. राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पाठोपाठ जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुरळा उडलाय. या निवडणुकीसाठी सातारा, सांगली आणि अहिल्यानगरमध्ये महायुती आणि मविआच्या एकत्र बैठका पार पडल्यात. जिल्हा राजकारणात महत्त्वाची मानली जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कशा हालचाली सुरू आहेत?.पाहूयात या रिपोर्टमधून.

Rohit Kadam

  • महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग

  • सातारा सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचे अपडेट

  • जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न

सातारा, सांगली आणि अहिल्यानगरमधील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मविआ आणि महायुतीमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 9 जागा बिनविरोध तर 12 जागांवर निवडणूक होणार आहे. दरम्यान, 10 वर्ष संचालक राहिलेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नसल्यानं सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला. आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली.

तर दुसरीकडे, सांगलीत महायुती आणि मविआ नेत्यांच्या बैठकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुमन पाटलांनी महिला गटातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 19 जागा बिनविरोध तर 2 दोन जागांवर निवडणूक होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि मविआचं समविचारी पॅनल एकत्र आलंय.

इतकंच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधसाठी 8 जागांवरील पेच सुटलाय..मात्र, उर्वरित 13 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आजी-माजी आमदार-खासदारांमध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळालं. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीसाठी काही जागांसाठी लढत अटळ असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

सलग 10 वर्षे संचालकपदी राहिलेल्या विद्यमान संचालकांना आता RBIच्या नियमामुळे निवडणुक लढवता येणार नाही... त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून दिग्गजांना माघार घ्यावी लागलीये. अशातच काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळतेय... मात्र, तरीही सत्ता टिकवण्यासाठी निवडणूका बिनविरोध होण्याची शक्यता मावळलीये. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीत कुणाचं पारडं जड होणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

SCROLL FOR NEXT