Eknath Shinde Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Eknath Shinde, Jai Gujarat : राज्यात सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा पेटलेला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी "जय गुजरात" असा नारा दिल्याने नवीन वाद उभा राहिलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात अमित शहांची स्तुती करताना शिंदेंनी गुजरातचा जयघोष केला.

Bharat Mohalkar

Why Eknath Shinde said Jai Gujarat in Pune event : राज्यात मराठीवरुन वाद पेटला असतानाच एकनाथ शिंदेंनी थेट जय गुजरातचा नारा दिलाय... त्यावरुन राज्यातील वातावरण तापलंय. एकनाथ शिंदे.... उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे... मात्र पुण्यातल्या कार्यक्रमात गुणगान करताहेत गुजरातचं....हिंदीसक्तीविरोधात चकार शब्द न काढणाऱ्या एकनाथ शिंदेंचं अमित शाहांसमोर मात्र गुजरात प्रेम चांगलंच उफाळून आलं. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट....

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवलीय.संजय राऊतांनीही डुप्लिकेट शिवसेनेचं गुजराती रुप समोर आल्याची टीका केलीय.. तर ऐशा नरा मोजूनी माराव्या पैचरा, म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय.तर शिंदें गटाच्या उदय सामंताची मात्र गुजरात प्रेमावरील सारवासारव करण्यासाठी तारांबळ उडालीय.

राज्य सरकारच्या हिंदीसक्तीला अजित पवारांनी उघडपणे विरोध केला...मात्र शिंदे अखेरपर्यंत हिंदीसक्तीचं समर्थन करत राहिले. मात्र आता फक्त हिंदीचं समर्थनच नाही तर अमित शाहांचं कौतूक करताना शिंदेंना आपण मुंबईसह महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या गुजरातचाच नारा देत असल्याचंही भान राहिलं नाही.... त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार झाला असताना शिंदेंचं गुजरातप्रेम त्यांच्या अंगलट येणार हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT