Revenue Minister Chandrashekhar Bawankule announcing a state-wide crackdown on fake birth and death certificates Saam Tv
महाराष्ट्र

Birth Certificate: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Cancelling Fake Birth And Death Records: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. आधारवर दिलेले दाखले रद्द करण्याचे, संशयास्पद नोंदी तपासण्याचे आणि संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Omkar Sonawane

राज्यात बेकायदेशीरपद्धतीने व खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

याबाबतचे परिपत्रक आज महसूल विभागाने जारी केले असून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्याची तपासणी करावी असे सुचविण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह व अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या उच्चस्तरीय बैठकीतील सूचनानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी आदेश दिले.

'या' तारखेनंतरचे आदेश रद्द होणार

११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्म मृत्यू दाखले दिले गेले आहेत, ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील. आधार कार्ड हा जन्माचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे महसूल विभागाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देऊन स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबवून विशेष मेळाव्याद्वारे या कामाचा निपटारा केला जावा असे बजावण्यात आले आहे.

खोट्या नोंदी आढळल्यास थेट गुन्हा दाखल

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत, त्यांची यादी बनवून त्यांना 'फरार' घोषित करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्याची स्थानिक पोलिसांनी करावी असे म्हटले आहे.

राज्यातील 'ही' शहरे रडारवर

अवैध जन्म-मृत्यू प्रकरणांमध्ये राज्यातील काही विशिष्ट शहरे आणि तालुके 'हॉटस्पॉट' असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अमरावती, सिल्लोड, अकोला, संभाजीनगर शहर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश असून, येथील तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना ही प्रकरणे गांभीर्याने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठळक वैशिष्ट्ये:

• केवळ ‘आधार कार्ड’वर मिळालेले जन्म दाखले रद्द होणार.

• जन्मतारखेत तफावत आढळल्यास थेट पोलिसात तक्रार.

• बनावट प्रमाणपत्र घेणारे लाभार्थी पळून गेल्यास त्यांना ‘फरार’ घोषित करणार.

• संभाजीनगर, अमरावती, लातूरसह १४ ठिकाणी विशेष तपास मोहीम.

मुळात जन्म मृत्यूचे दाखले देण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा आहे. मात्र एक वर्षे उलटून गेल्यावर हे दाखले महसूल विभागामार्फत दिली जातात. त्यासाठी तहसीलदार व त्यावरील अधिकारी सक्षम आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बरेच गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता प्रमाणपत्र परत घेणे किंवा त्यांची फेरतपासणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'या' तारखेला महिलांच्या बँक खात्यात येणार १०-१० हजार रुपये

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना संपवलं? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

ठाकरे बंधुंच्या वाटाघाटी पूर्ण? ठाकरेंच्या युतीचा फॉर्म्युला ठरला?

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाचा होतोय बिहार; स्थानिक निवडणुकीत रक्तरंजित खेळ, VIDEO

नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचा थर? ह्रदयविकाराचा धोका वाढतो? आजच ३ मसाले खा, धोका टळेल

SCROLL FOR NEXT