BJP’s massive disciplinary action in Jalgaon sparks political shockwaves as 27 leaders, Saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजपच्या माजी नगरसेवकासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, राजकारणात खळबळ

Jalgaon Politics : भाजपच्या काही इच्छुकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. हे बंडखोर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याने भाजपनं त्यांची हकालपट्टी केलीय.

Bharat Jadhav

  • जळगावच्या राजकारणात भाजपची मोठी कारवाई

  • माजी नगरसेवकासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

  • ऐन निवडणुकीत घेतलेल्या निर्णयामुळे खळबळ

जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडलीय. ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात भाजपनं २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केलीय. भाजपनं केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकारणासह राज्यातही खळबळ उडलीय.

राज्यातील २९ महापालिकांमध्ये आपल्या सत्ता येण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रचाराचा धुरळा उडवलाय. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागोजागी जात प्रचार सभा घेत आहेत. युपीमधीलही भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. त्याच भाजपच्या हायकमांडनं पक्षातील पदाधिकाऱ्यांची हाकालपट्टी केली आहे.

का केली हाकलपट्टी ?

जळगाव महानगरपालिकेत महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षाने कारवाई आहे. जळगाव महानगरपालिकेत युतीधर्म न पाळणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बंडखोरांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक रंजना सपकाळे, कांचन सोनवणे चेतना चौधरी ,जितेंद्र मराठे यांच्यासह भाजपाचे बंडखोर सदस्य यांची पक्षातून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

SCROLL FOR NEXT