Congress Protest Toll Plazas On Pune Bengaluru Highway: Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: रस्त्याची दुरावस्था, कोल्हापूर- पुणे महामार्गावरील ४ टोलनाक्यांवर काँग्रेसचे आंदोलन; विनाटोल वाहने सोडली

Congress Protest Toll Plazas On Pune Bengaluru Highway: काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारले आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलने होणार असून काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Gangappa Pujari

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे , रेंगाळलेले विस्तारीकरण यावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाची वाईट अवस्था असताना टोल का द्यायचा? असा सवाल करत आज काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारले आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलने होणार असून काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहे.

किणी टोलनाक्यावर बंटी पाटलांचे आंदोलन

कोल्हापूर ते पुणे दरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे मग टोल का द्यायचा? असा सवाल करत किणी टोलनाक्यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच वाहनांना टोल न घेता वाहने सोडली. महायुतीचे नेते हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरत आहेत. त्यामुळे त्यांना महामार्गावर असणारे खड्डे दिसत नाही. अशी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना केलेली आहे.

साताऱ्यात काँग्रेस आक्रमक

कोल्हापूर ते पुणे दरम्यान रस्त्याची झालेली दुरवस्था व त्याचा नागरिकांना, प्रवाश्यांना व वाहनधारकांना होणारा त्रास याबाबत कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोलनाक्यावर टोल न घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. याच मागणीसाठी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास व वाहनांचे होणारे नुकसान सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले.

पुणे बंगळूर महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर काँग्रेसने आंदोलन केले. टोल नाक्यावर भरमसाठ टोल वसूल केला जातो. मात्र टोलच्या बदल्यात वाहनचालकांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचं म्हणतं काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात खेड-शिवापूर टोल नाक्यावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावर वाहनांचा टोल न घेताच वाहने सोडण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT