balasaheb thorat Saam TV
महाराष्ट्र

Balasaheb Thorat: मोठी बातमी! बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप

बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Balasaheb Thorat: राज्याच्या राजकारणातून सध्या मोठी बातमी समोर येत असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू होते.

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आता वाढदिवसा दिनीच बाळासाहेब थोरातांनी मोठा धक्का दिला आहे. (Latest Marathi News)

सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन सुरू झाला होता वाद...

बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा म्हणजे कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पत्र दिले होते.

थोरातांनी लिहले होते पत्र...

"विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे," अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली होती. त्यानंतर आता थेट राजीनामा दिल्याने कॉंग्रेमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT