Cm Eknath Shinde Saamtv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ! CM शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त शिवसेनेकडून टीझर जारी; रामराज्य अन् हिंदुत्वाची खास झलक

Cm Eknath Shinde Visit Ayodhya Teaser: येत्या ९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे

Rashmi Puranik

CM Eknath Shinde Ayodhya Visit: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. येत्या ९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्यामध्ये ते राम जन्मभूमीचे दर्शन घेतील, तसेच शरयू नदीकाठी आरतीही होणार आहे. या दौऱ्याचा टीझरही शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यानिमित्ताने शिवसेनेकडून (Shivsena) एक टीजर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ असं म्हटलंय. अयोध्या दौऱ्यानतंर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात शिवधनुष्य यात्रा सुरू करणार आहेत.

या टीजरमध्ये राज्यात सुशासन असावं आणि रामराज्यात शासक नाही तर सेवक असावा असा उल्लेख केला आहे. "जनताच कुटुंब असावी आणि मानवाची सेवा हीच सर्वात महत्वाची असावी. अन्यायाच्या विरोधात आवाज उठेल आणि भगवा कधीच खाली येणार नाही. कणाकणात राम असावा," असेही या टीझरमध्ये सांंगण्यात आले आहे.

महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा, असे मुद्दे या टिझरवरून अधिक ठसवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सोशल मीडियावर हा टिझल वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेतेल. अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी ही टॅगलाइन असून राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)

९ एप्रिलला असेल अयोध्या दौरा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि खासदार, काही महत्त्वाचे पदाधिकारी हे येत्या 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा रंगली होती.

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल, असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्लॅन आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT