Eknath Shinde
Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde: दौरा ठरला! 'या' तारखेला CM शिंदे ४० आमदारांसह अयोध्येला जाणार; प्रभू रामचंद्रांचं दर्शन अन् शरयूकाठी पूजा करणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CM Eknath Shinde Visit Ayodhya: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या ४० आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या दौऱ्याबाबत निश्चित तारीख अद्याप समोर आली नव्हती. याच प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ ते १० एप्रिल दरम्यान अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले आहे. अयोध्येला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत तसंच शरयू नदीच्या काठी पूजा आणि आरतीही करणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे (शिंदेगट) ४० आमदारही जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

याबद्दल बोलताना, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे बोलत आहेत ते पुर्णत्वास येत आहे. बाळासाहेबांचे विचार बरोबर घेऊन चाललं तर धनुष्यबाण कळायला काही हरकत नाही," असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. त्यामुळेच त्यांच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहे. याआधी ते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant Hospitalized : कॅन्सरच्या चर्चादरम्यान राखी सावंतने स्वत:च हॉस्पिलमधून दिले हेल्थ अपडेट, कधी होणार सर्जरी?

Mrunal Thakur: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Bike Stunt Video : बाईक स्टंटच्या नादात भीषण अपघात; गर्लफ्रेंडसोबत तरुण धाडकन खाली आदळला, पाहा VIDEO

T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT