भाजपनं तरुणांना ४०% संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारीत व्यापक फेरबदल होण्याची शक्यता आहे.
युवा नेतृत्वाला मोठी संधी मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण तापलंय. नेत्यांच्या पक्षात्तरांमुळे चर्चेत आलेली निवडणुकीत भाजपनं नवीन एक डाव खेळलाय. भाजप या निवडणुकीच्या उमेदवारीत तरुणांसाठी ४० टक्के आरक्षण ठेवणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सुतोवाच केले आहे.
युवा मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी युवा शक्तीचा उल्लेख केला. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत तरुणांना संधी दिली जाईल. भारतीय जनता पक्ष (भाजपा) ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांसाठी किमान ४० टक्के तिकिटे राखीव ठेवणार असल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. बीएमसीसह राज्यभरात होणाऱ्या नागरी निवडणुकांच्या आधी त्यंनी हे विधान केलंय. मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिका संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण होणार आहेत. २०२२ पासून या निवडणुका प्रलंबित आहेत.
दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये कमीत-कमी ४० टक्के उमेदवार हे ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, अशा पार्श्वभूमीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडणूक लढवत आहेत, जे समाजासाठी चिंतेचा विषय बनतोय.
कोणतीही लोकशाही संस्था ही समाजाचा आरसा असते आणि संस्था समाजाला आकार देतात. गेल्या बीएमसी निवडणुकीत एकूण २१६ उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड होते. दरम्यान काही लोक वाईट असतात, त्यामुळे सर्वच लोकांना भ्रष्ट म्हणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. भारत पंतप्रधान नरेंद मोदींच्या नेतृत्त्वात प्रगती करत आहे. ते म्हणाले, "जर संपूर्ण प्रणालीमध्येच त्रुटी असती तर आपला देश इतक्या वेगाने प्रगती केली नसती."
दरम्यान महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दावा केला की, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सत्ताधारी पक्षाचे १०० नगरसेवक बिनविरोध निवडून येतील. दरम्यान आतापर्यंत तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडणून आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच १०० हून अधिक भाजप नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत," असे चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सांगितलं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.