Maharashtra cabinet seven major decisions 2026 saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet: नोकर भरतीचे सुधारित आरक्षण, आरोग्य व्यवस्था; राज्य मंत्रिमंडळाचे ७ धडाकेबाज निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नोकर भरती, गुणवंत खेळाडूंचं सुधारित आरक्षण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, वस्त्रोद्योग आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. माढा येथे नवीन सत्र न्यायालय स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • राज्य मंत्रिमंडळाने क्रीडा, आरोग्य, वस्त्रोद्योग आणि विधी व न्याय क्षेत्रांशी संबंधित सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत.

  • गुणवंत खेळाडूंसाठी शासकीय नोकरीतील आरक्षणाच्या सुधारित धोरणाला मंजुरी

  • सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे नवीन सत्र न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात बैठकीत आज सात धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा, आरोग्य, वस्त्रोद्योग आणि विधी व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू करण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने नवा प्रकल्प राबवण्यास आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे नवीन सत्र न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय.

खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द.

(शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग)

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी "प्रगती (PRAGATI - Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration)" प्रकल्प. प्रकल्प सन २०२६-२०३१ या कालावधीत राबविण्यात येणार. त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास व त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास मान्यता. (सार्वजनिक आरोग्य विभाग)

ह्योसंग इंडिया प्रा.लि. यांना भांडवली अनुदान देण्यास मंजुरी. (वस्त्रोद्योग विभाग)

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदे व खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)

मुंबईतील कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटरच्या भाडेपट्ट्याचे सवलतीच्या दराने नुतनीकरणास मंजुरी (महसूल विभाग)

चेंबूर येथील भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशन संस्थेला त्यांच्या वहिवाटीतील जमीन देण्यास मंजुरी (महसूल विभाग)

नागपूरमधील कोराडी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यास मंजुरी (महसूल विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Winning Candidate List: गोकुळचे नवे कारभारी कोण? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार; बेकायदा अटक खपवून घेणार नाही- हायकोर्टानं सुनावलं

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; भातशेतीचे नुकसान होण्याची भीती

Ashutosh ranka and Saurav das : सौरव दास, आशुतोष रांकाची कोठडी वाढणार? कोर्टानं आदेश ठेवला राखून

Manmad Vande Bharat : मनमाडकरांसाठी खुशखबर! आणखी एक वंदे भारत थांबणार, तिकिट किती?

SCROLL FOR NEXT