Maharashtra budget session CM Devendra Fadanvis
महाराष्ट्र

Maharashtra budget session : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

Maharashtra budget session 2026 Latest News : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कर्जमाफी, विधेयके आणि राजकीय घडामोडींचा आढावा जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra Budget Session CM Devendra Fadnavis : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होईल. तर 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान अजितदादांच्या विमान अपघात, मंत्रालयातील लाचखोरी, शेतकरी कर्जमाफी मुलुंड मेट्रोचा अपघात अशा मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जातोय. अर्थसंकल्पिय अधिवेशनात १५ विधेयके मांडली जाणार आहेत. त्याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविलेले मुद्दे व सूचनांचा समावेश होईल. (Maharashtra Budget Session 2026 Begins)

जनसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील पाळली जाईल यासाठी काही कडक पावलेही उचलायची आवश्यकता वाटल्यास उचलली जातील. जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पिय अधिवेशनात १५ विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन

प्रस्तावित विधेयके व अध्यादेश

विधानसभेत प्रलंबित विधेयक:- २

सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणारे अध्यादेश :- ३

प्रस्तावित विधेयके:- १०

एकूण :- १५

विधानसभेत प्रलंबित विधेयक

(१) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२५ (उद्योग, ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग)

(२) महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, २०२५ (गृह विभाग)

सभागृहाच्या पटलावरती ठेवण्यात येणारे अध्यादेश

१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२५ (नगरविकास विभाग)

२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ (ग्रामविकास विभाग)

३) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

प्रस्तावित विधेयक

१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा)

विधेयक, २०२६ (सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १३ याचे रूपांतरित विधेयक) (नगरविकास विभाग)

२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२६. (सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १४ याचे रूपांतरित विधेयक) (ग्रामविकास विभाग)

३) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२६ (सन २०२६ चा अध्यादेश क्रं. १ याचे रूपांतरित विधेयक) (उच्च व तंत्र शिक्षण) (राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचा दिनांक वाढविता यावा म्हणून कलम १०९ ची सुधारणा)

४) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन विधेयक, २०२६ (उच्च व तंत्र शिक्षण)

५) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

६) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

७) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

८) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ (महसुल व वन विभाग)

९) महाराष्ट्र उद्दाहक, सरकते जिने व सरकरते मार्ग (सुधारणा), विधेयक, २०२६. (उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)

१०) महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Carrot And Beetroot Juice For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी प्या गाजर आणि बीट ज्यूस, केस गळतीही होईल कमी

Matka Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा थंड मलाईदार मटका कुल्फी; सोपी रेसिपी करा ट्राय

MBBS चा विद्यार्थी गोत्यात! दुबईच्या पोराला गाडी देणं पडलं महागात; मुंबईतील प्रतिकच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड सुरू

सरकारी पत्रात भाजप आमदाराचा भूमाफिया उल्लेख; नागरिकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT