Nawab MAlik Saam Tv
महाराष्ट्र

Nawab Malik: नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा; मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर

Nawab Malik Money Laundering Case: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. मनी लॉंन्ड्रीग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना सहा महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Nawab Malik News:

राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. मनी लॉंन्ड्रीग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना सहा महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Maharashtra Politics News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा दिलासा मिळाला आहे. सध्या नवाब हे गेल्या दोन महिन्यांच्या जामिनावर आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन ६ महिन्यांनी वाढवला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन देण्यात आला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात होते. परंतु, तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना २ महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि पंकज मिथल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तपास यंत्रणेला त्यावर कोणताही आक्षेप नसल्याचे सांगत सहा महिने जामीन वाढवत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मलिकचा अंतरिम जामीन तीन महिन्यांनी वाढवला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYC मधला पहिला मोठा अडथळा दूर; लाडक्या बहिणींची चिंता मिटली, वेबसाईटमध्ये बदल

ड्रग्ज तस्करीतील आरोपी भाजपात, राजकारणात संतोषचा 'परमेश्वर' कोण?

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...

Soft And Pink Lips: काळे ओठ होतील मऊ अन् गुलाबी, रात्री झोपण्यापूर्वी लावा या ५ गोष्टी

SA20 लीगचा चौथा सिझन डिसेंबरपासून; 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार सामने

SCROLL FOR NEXT