Marathi News Live:  Saam TV
महाराष्ट्र

Marathi News Live: पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केले जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

साम टिव्ही ब्युरो

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने केले जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप

(सुशांत सावंत)

भाजपाच्या कोअर कमिटीत येणाऱ्या पालिका निवडणूकासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली

या बैठकीत जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप भाजपा नेत्यांना देण्यात आले.

मुंबई पालिका निवडणुकिसाठी आशिष शेलार यांना जबाबदारी देण्यात आली.

ठाणे पालिकेसाठी निरंजन डावखरे

नागपूर पालिकेसाठी सुधीर मुंनगंटीवार यांना जबाबदारी.

12 तास उलटूनही यशवंत जाधव याच्या घरी IT ची छापेमारी सुरूच

(सुरज सावंत)

-12 तास उलटूनही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव याच्या घरी IT ची छापेमारी सुरूच.

-आज सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे पथक दाखल झालं आहे.

-इनोव्हा गाड्यांमधून पथक यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले होते.

-CISF team देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

-यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांच्या मदतीने भारतातून १५ कोटी रुपये दुबई येथील दोन कंपन्यांमध्ये गुंतवल्याचेसमोर आले आहे.

-केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेते.

कंगनाने दाखल केलेल्या अर्जांवर मुंबईतील दिडोशी सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला

अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील सुनावणी दुसर्‍या कोर्टात हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी कंगनाने केला होता अर्ज

- जावेद अख्तर यांनी कंगनाने एका मुलाखतीमध्ये आपली बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रार याचिका दाखल केली होती

- तर कंगनाने अख्तर यांच्या विरोधात धमकी खंडणीचा आरोप करत तक्रार केलेली आहे

- अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील न्यायाधीश पक्षपाती करत असल्याचा आरोप करत कंगनाने दुसऱ्या कोर्टात दोन्ही याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

टिईटी 2018 च्या परीक्षेतही अपात्र उमेदवार पात्र केले

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या 2019- 20च्या परीक्षेत तब्बल 7 हजार 800 बोगस अपात्र उमेदवार आढळल्यानंतर आता 2018 च्या परीक्षेतही 1778 जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याचे पोलीस चौकशीतुन पुढे आले आहे त्यामुळे एकूणच वाढत जाणारा हा आकडा पाहता टीईटी घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढत चाललीय

युक्रेन मध्ये नवी मुंबईतील एमबीबीएस चा विद्यार्थी अडकला

नवी मुंबई - युक्रेन व रशियामध्ये युद्ध सुरू झाल्याने अनेक भारतीय नागरिक युक्रेन मध्ये अडकून पडलेत. नवी मुंबईतील नेरुळ येथील अभिजीत थोरात हा एमबीबीएस चा विद्यार्थी देखील युक्रेन मध्ये अडजून पडला असून भारत सरकारकडे मदतीचे आवाहन करत आहे. काही दिवस पुरतील एवढा जीवनावश्यक वस्तूंच्या साठा घेतला असला तरी त्यापुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला असून लवकरात लवकर आमची येथून सुटका करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर शिवसेनेचे नेते?

(सुशांत सावंत)

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या मागे तपास यंत्रणांचे ग्रहण हे सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीकडून नवाब मलिक यांना अटक झाली. महाविकास आघाडीचा दुसरा मंत्री तुरुंगात गेल्याने एकच खळबळ माजली. मलिकांना अटक होऊन ४८ तास उलटत नाही तोच, आज सकाळी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव या़च्याघरी IT चे अधिकारी पोहचल्याने चर्चांना उधाण आले... (वाचा सविस्तर वृत्त काही वेळात)

नवाब मलिकांची प्रकृती बिघडली; जे जे रुग्णालयात अ‍ॅडमिट

(रश्मी पुराणिक)

- नवाब मलिक प्रकृती बिघडली

-जे जे रुग्णालयात अ‍ॅडमिट

- तब्येत खराब झाल्यामुळे तपासणी साठी नेले होते

- मलिक यांना पोटाचा त्रास सुरू झाल्याने चाचणीसाठी वेळ लागला.

ST विलीनीकरण संदर्भात थोड्याच सुनावणी; बंद लिफाफ्यात काय?

(रामनाथ दवणे)

-ST विलीनीकरण संदर्भात थोड्याच वेळात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार

- राज्य सरकारच्या अहवालावर आज युक्तिवाद होण्याची शक्यता

- बंद लिफाफ्यात काय असणार ?

- मुख्यमंत्र्यांचा काय अभिप्राय असेल ?

- ST कर्मचाऱ्यांसह सगळ्यांचे सुनावणीकडे लक्ष

मनसेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन पुण्यात होणार?

(अश्विनी जाधव केदारी)

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर करणार असल्याची शक्यता

- येत्या ९ मार्चला मनसेचा १६ वा वर्धापन दिन

- मनसेकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु

- गणेश कला क्रीडा मंच येथे हा भव्य वर्धापनदिन सोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा

- काही दिवसांत पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर मनसे आता या वर्धापन दिनानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन करणार

किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी रद्द

(सुरज सावंत)

किरीट सोमैयाचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर आज काही कारणास्तव सुनावणी झाली नाही

28 फेब्रुवारी रोजी होणार पुढील सुनावणी

पीएमसी बँक घोटळ्याचे पैसे निकॉन infrastructure कंपनीत गुंतवल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता

निकॉन infrastructure कंपनी ही सोमय्या यांच्या मालकीची आहे

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी राजेश वाधवान याचे नील सोमय्या यांच्याशी संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता

या प्रकरणी सोमय्या बाप-बेटे तुरुंगात जातील असा असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विधान केलं होतं

याच प्रकरणी आता नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे

जितेंद्र आव्हाडांच्या निवास्थानी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची बैठक

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची बैठक

जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक

जयंत पाटील उपस्थित राहणार

नवाब मलिक प्रकरणावर होणार चर्चा

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये गोळीबार

(विनोद जिरे)

बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात आज सकाळी ११ च्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती असून यात दोघे जखमी झाले आहेत . बीडच्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत . सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी जखमींची नावे आहेत . बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली

नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका

(अभिजित सोनवणे)

- भाजपच्या आजी-माजी उपमहापौरांसह 4 ते 5 भाजप नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार

- मुंबईत मातोश्रीवर करणार शिवसेनेत प्रवेश

- आज संध्याकाळी मातोश्रीवर होणार पक्ष प्रवेश सोहळा

- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेचं भाजपवर सर्जिकल स्ट्राईक

यशवंत जाधव ईडी छापा - काय आहेत आरोप

(सुशांत सावंत)

मुंबई - यशवंत जाधवांवर १५ कोटी घोटाळ्याचा आरोप

हे १५ कोटी रूपये यूएईला हलवल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता

अहमदनगर जिल्ह्यातील 18 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले

नगर - रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेआहे.अहमदनगरच्या एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT