Marathi News Live - Saam Tv
महाराष्ट्र

Marathi News Live: अरविंद केजरीवाल अडचणीत, गुन्हा दाखल होणार

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

साम टिव्ही

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

अरविंद केजरीवाल अडचणीत, गुन्हा दाखल होणार; अकाली दलाची तक्रार

पंजाब निवडणुकीच्या (Panjab Assembly Election) तोंडावर आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खरं तर, पंजाबमधील राज्य निवडणूक आयोगाने मोहाली प्रशासनाला केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात दोघांचा जागीच मृत्यू

(दिलीप कांबळे)

मुबंई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गवर मुबंई लेन वर ट्रेलरने चार वाहनांना धडक दिल्याने दोघांचा म्रुत्यु तर अन्य दोघे जखमी.घटनास्थळी आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलिस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य सेवा यांनी मदत कार्य केले. या अपघातात अनिता सिंग वय 54 गंभीर, अखिलेश सिंग वय 55 किरकोळ जखमी रा. रोसे - पारडे, पुणे. दोघाही जखमीना mgm कामोठे येथे हलविले. या अपघातात चालकाचे ट्रेलर वरचे नियंत्रण सुटले.

मुंबईत सेना-भाजप आले आमने-सामने

(सुशांत सावंत)

मुंबई : कांदिवलीमध्ये जलतरण तलावाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सेना-भाजप आमने सामने

महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार योगेश सागर यांच्या समोर कार्यकर्त्यांच्या घोषणा

भाजपकडून या जलतरणाचे उदघाटन उद्या करण्यात येणार होत मात्र पालिकेकडून आजच कार्यक्रम घेण्यात आल्याने वातावरण तापलं

मार्च नंतर राज्य १०० टक्के अनलाॅक

(लक्ष्मण सोळुंके)

जालना : मार्च महिन्यानंतरच राज्यात 100 टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे.सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कमी झालेली नाही असंही टास्क फोर्सने स्पष्ट केलं. कोरोनाच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यात लागू केलेले निर्बंध राज्य सरकार आता कमी करू शकतं असं पत्र केंद्रानेच राज्याला पाठवलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

(रश्मी पुराणिक)

बहुचर्चित आणि प्रतीक्षित अशा चौथ्या महिला धोरणाचा मसूदा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसंच आई भवानीच्या चरणी अर्पण करण्यात आला. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाची प्रत अर्पण करण्यात आली (सविस्तर वृत्त काही वेळात)

नारायण राणे वैफल्यग्रस्त - आमदार वैभव नाईक

(विनायक वंजारे)

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री झाल्यापासून गेल्या वर्षभरात नारायण राणेंनी शिवसेनेला संपवणार अशा अनेक वलग्ना केल्या होत्या. मात्र शिवसेनेचे ते काहीही करू शकले नाहीत त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले असून ते शिवसेनेवर आरोप करत आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक होऊन पोलीस कोठडी झाली तेव्हापासून राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी आज केली (सविस्तर वृत्त काही वेळातच)

ईडीचा मोठा घोटाळा बाहेर काढणार- राऊत

(रश्मी पुराणिक)

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. तुम्ही आमच्या पाच पंचवीस हजारांची चौकशी करता, आम्हीही तुमचे कोट्यवधींचे घोटाळे बाहेर काढू असे राऊत सोमय्या यांना उद्देशून म्हणाले. सोमय्या यांचा पालघरमध्ये २६० कोटींचा प्रकल्प सुरु आहे, असाही आरोप राऊत यांनी केला.. (सविस्तर वृत्त काही वेळातच)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला पुणे दौऱ्यावर

(अश्विनी जाधव केदारी)

- वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्प उदघाटन करणार तसेच महापालिकेत बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच अनावरण पंतप्रधान करणार

- याआधीही नरेंद्र मोदीचा पुणे दौरा नियोजित होता, परंतु काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता

- महापालिका निवडणुक पार्श्वभूमीवर मोदी यांच्या दौऱ्याकडे लक्ष

- पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, पवई येथे झाला अपघात. अंधेरी हुन घाटकोपर कडे जाताना झाला अपघात.

शिवभक्तांच्या मोटर सायकलला वरंध घाटात अपघात २ जखमी

(राजेश भोस्तेकर)

रायगड - भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला. मोटर सायकलसह तीन जण 200 फुट दरीत कोसळले. या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 सर्व राहणार भोंगवली तालुका भोर, अशी जखमींची नावे आहेत

मुंबईच्या तीन पोलिसांवर खंडणीचा गुन्हा

(सूरज सावंत)

मुंबई : अधिकाराचा गैरवापर करून पैसे उकळणाऱ्या 3 पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तीन पोलीस अंगडिया व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे तक्रार आली होती, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. पोलिस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम आणि पोलिस उपनिरीक्षक समाधान जामठाडे अशी आरोपी पोलिसांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सुशांतसिंह, दिशा सालियनची हत्या झाली- नारायण राणेंचा गंभीर आरोप

मुंबई - दिशा सालियनचा पोस्टमाॅर्टेम रिपोर्ट अजून का आला नाही? दिशा सालियनचा बलात्कार करुन खून करण्यात आला. सुशांतसिंह दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता म्हणून त्याची हत्या झाली, असा आरोप नारायण राणेंनी केला आहे. सुशांतसिंहच्या इमारतीचे सीसीटिव्ही कुठे गायब झाले, असाही सवाल राणे यांनी विचारला आहे.

बाळासाहेब माझ्या बंगल्याच्या भूमीपुजनाला नक्की आले असते- राणे

(सुशांत सावंत)

भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या बंगल्याबाबत आलेल्या नोटीशीचा खुलासा केला. ते म्हणाले, "मातोश्री पार्ट दोन बांधली आम्ही काय म्हणालो? त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लॅन माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घराबाबत कधी बोललो नाही. असे सूडबुद्धी असलेले लोक सत्तेवर आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जुहूमधील बंगल्याची तक्रार करणारा मुंबईतला नव्हे तर सिंधुदुर्गातला कोकणी माणूस आहे. बाळासाहेब असते तर माझ्या बंगल्याच्या भूमीपुजनाला नक्की आले असते."

शिवसेनेचे सध्याचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आलेत..- राणेंचा आरोप

(सुशांत सावंत)

मुंबई - भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या बंगल्याबाबत आलेल्या नोटीशीचा खुलासा केला. ते म्हणाले, "अनेकांचे फोन आले की तुमच्या घरावर नोटीस बजावली आहे. त्यामुळे वास्तववादी चित्र मांडण्यासाठी आलो आहे. १७ सप्टेंबर २००९ साली या घरात आलो. १३-१४ वर्षे झाली आहेत. जगात ज्यांचे नांव आहे अशा नामांकित आर्किटेक्टने ही इमारत बांधली. १९९१ च्या डीसी रुल्स प्रमाणे इमारत बांधली. महापालिकेने सर्व सर्टिफिकेट दिली होती. संपूर्ण कायदेशीर काम केले आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलेले नाही. या घरात आम्ही फक्त आठ जण राहतो. तिथे अन्य कुठलाही व्यवसाय चालत नाही. हे कुणालाही विचारा. १०० टक्के कायदेशीर इमारत असतानाही शिवसेनेकडून नोटीस बजावली गेली. महापालिका त्यांच्याकडे आहे. हा दुष्टपणा मा. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. पण आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत."

खेळण्यातले पिस्तुल दाखवून मागितली खंडणी

(सूरज सावंत)

मुंबई मुंबईच्या कुलाबा परिसरात खेळण्यातल्या बंदुकीने हाॅटेल मालकाकडे खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. सिल्वारज पिल्ली असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सिल्वाराज हा तक्रारदार यांच्या हाॅटेलमध्ये खंडणी मागत होता. खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागतून त्याने तक्रारदाराला मारहाण करून सोबत असलेली नकली पिस्तुल त्याच्या डोक्याला लावून धमकी दिली होती.

नागपूरात सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

(संजय डाफ)

- डॉ. अभिजित रत्नाकर धामणकर असं 39 वर्षीय आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव

- विषारी इंजेक्शन टोचून जीवन यात्रा संपविली

- पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यावर केला होता दुसरा विवाह

थोड्याच वेळात नारायण राणेंची पत्रकार परिषद..कोणता गौप्यस्फोट करणार

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक झाले असून काही वेळातच ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले...असे ट्वीट राणे यांनी काल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT