कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या तालुक्यातील कांबा परिसरात दुर्घटना घटना घडली आहे. आज सायंकाळच्या सुमारास कल्याणसह आज बाजूच्या परिसरात कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. कल्याण ग्रामीण भागात देखील पावसाचा जोर होता. याचवेळी कांबा दगड खदाणीत काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
तुर्भे येथील मॅफको मार्केट परिसरातील रस्ते जलमय झालेत. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक गाड्या बंद पडल्या आहेत.
नाना पटोले यांनी खरगे यांच्या १० राजाजी मार्ग या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागा वाटपसंदर्भात पटोले यांनी माहिती दिली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस इतर मित्र पक्षांसोबत एकमताने लढेल, अशी ग्वाही दिली आहे. सोबतच प्रचाराची रणनीती आणि राज्यातील सध्याची परिस्थिती यावरही चर्चा झाली.
खोपोलीतील झेनिथ धबधबा येथील घटना
स्वप्नाली शिरसागर वय वर्ष 22 रहाणार कृष्णा व्हॅली, खोपोली असे मृत तरुणीचे नाव आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरात भाजपाला बळ मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पिता-पुत्रांनी केला भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापूरात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रवेश केला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनीही आपलं आंदोलन मागे घेतले आहे.
पुणे शहरातील मुख्य भागात एकूण 124 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. पुणे हवामान विभागाने दिली माहिती आहे. तीन तासाच्या मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे.
शिवाजीनगर: १२४ मिलिमीटर
वडगाव शेरी: ७१.५ मिलिमीटर
कोरेगाव पार्क: ६३ मिलिमीटर
हडपसर: ३८ मिलिमीटर
पुण्यात सलग ३ दिवसांपासून दुपारनंतर मुसळधार पाऊस झालाय. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू, पाटबंधारे विभागाने माहिती दिलीय. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण १०० टक्के फुल्ल झाले आहे.
अजित पवार गटाची जण संवाद यात्रा 28 सप्टेंबर ला भंडारा जिल्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रात येणार असल्याची माहिती तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली आहे. तुमसर शहरात आधी जन सांवाद यात्रा भ्रमनती करून नेहरू ग्राउंड वर या जण संवाद यात्रेचे सभेत रूपांतर होणार असून उप मुख्यमंत्री अजित पवार महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे खा प्रफुल पटेल आ राजू कारेमोरे माजी आ राजेंद्र जैन हे उपस्थित लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आज त्यांचा विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. शासनाने 15 मार्च 2024 चां संचं मान्यतेच्या निर्णय रद्द करावा, कंत्राटी भरती करू नये, शिक्षकांना मुख्यालय राहण्याची सक्ती करू नये, पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी, अशैक्षणिक कामे करायला सांगू नये, यासह विविध मागण्या घेऊन आज राज्यातील शिक्षकांनी एका दिवसाचा संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. मोर्चानंतर शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे पाठविले आहे.
बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग. येथील चांदणी नदीला आला पूर आहे. आगळगाव - उंबरडे पुलावरून जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करत आहेत. शेतकरी आपल्या जनावरांसह तर दुचाकीस्वार जीवाची पर्वा न करता ओलांडत आहेत. पूल पावसाचा जोर कायम राहिल्यास आगळगाव परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
रेड अलर्ट दिलेला असून पुढील २४ तासांत पुणे, रायगड, रत्नागिरी येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेले सर्वे सोबत आणले होते. जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. लवकरच या संदर्भात दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. आमच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये किंवा जागा वाटपाबाबत कोणताही वाद नाही आणि लवकरच या संदर्भातला निर्णय होईल अशी माहिती भाजपचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
पुण्यातील शहरासह उपनगरात जोरदार पाऊस
सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस
समृद्धी महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला. समृद्धी महामार्ग दोन तासांपासून मार्ग ठप्प आहे.
या आंदोलनामुळे वाहानाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांनी जाळले टायर
समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करत आंदोलकांनी अडवला समृद्धी .
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वरूड गावाजवळ समृद्धी रोखला.
समृद्धी वर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
नेवासा येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण
कार्यकर्ते झाले आक्रमक
संभाजीनगर महामार्गावर पेटवले टायर
टायर पेटवून महामार्ग अडवला.
नेवासाफाटा येथे अडवला महामार्ग
गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा मागणी
सरकार लक्ष देत नसल्याने महामार्ग अडवला
रायगड ब्रेकिंग :
० मुंबई गोवा महामार्गावर माणगावनजीक भीषण अपघात झालाय.
माणगाव तालुक्यातील ढालघर फाटा येथे कंटेनरची मोटर सायकलला धडक बसली.
० मोटर सायकलवरील महिलेचा अपघातामध्ये मृत्यू तर अन्य एक जण जखमी झाला आहे.
० माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
० वाहतुक सुरळीत आहे.
नवी मुंबईतील सीवूड सेक्टर 46 येथे पाम बीच मार्गाला जोडणाऱ्या अक्षर चौकातील रस्त्यावर खड्डा पडला. खड्ड्या खालून वेगाने पाण्याचा प्रवाह वाहतोय. पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहता संपूर्ण रस्ता खचण्याची शक्यता आहे. रस्ता तात्पुरता करण्यात बंद करण्यात आला आहे.
- नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चार गावच्या ग्रामस्थांचे उपोषण आंदोलन
- मानेवाडी, बाभुळगाव, शिंपोरा, करपडी या गावातील ग्रामस्थांचे एकत्रित उपोषण
- रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उपोषण
- बाभुळगाव - करपडी, शिंपोरा - खेड या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी
- खड्डेमय रस्त्यांमुळे चार गावातील ग्रामस्थांचे होतयेत हाल
मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पावसाची बॅटिंग केली आहे. मुंबईतील मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजूर, विक्रोळी घाटकोपर या भागात जोरदार पाऊस सुरु आहे.
आकाशवाणी आमदार निवासाच्या ६ व्या मजल्यावर आंदोलकांचा ठिय्या केला आहे. लोकांना उतरवण्यासाठी फायर फायटर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मनोज जरांगेंनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित केले. सलाईन लावून उपोषण करण्यात काय अर्थ? असे त्यांनी सांगितले. फडणवीसांना संधी दिली होती. आचारसंहितानंतर सांगतो कोण कोण काय बोलले, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन सुरू आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील दहीफळ गावातील पाण्याच्या टाकीवर दोन तरुण चढले. बालाजी भातलवंडे आणि मल्हारी गवळी अशी या तरुणांची नावं आहेत.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्ट ताशेरे ओढले यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 'कोर्टाला काय वाटलं याबाबत पोलीस उत्तर देतील. पोलिसांनी कृती केली पण विरोधाकांनी राजकारण केलं. गुन्हेगारी वृत्तीला बळ देण्याचे काम विरोधक करत आहे. राजकारण करून काय मिळवायचे आहे. आपला स्थर जातोय, दोघांनी एकत्र यायला पाहिजे. कोर्टाला पोलिस सादर करतील.'
धाराशिवमधील निम्म तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. निम्म तेरणा प्रकल्पाचे 14 दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडले असून तेरणा नदीपात्रात 16 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकमध्ये दाखल
- पुढच्या काही क्षणात सभास्थळी होणार दाखल
- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार
- प्रभू श्रीरामांचे पूजन करून होणार बैठकीला सुरुवात
मांजरा धरण क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणातील पाणी पातळी 95 % टक्क्यांनी वाढली आहे.. पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडून मांजरा नदीपात्रत 49.00 क्यूमेक्ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान नदी काटच्या गावांना प्रशासनाने सतर्कच्या इशारा दिला आहे..
शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज शाळा बंदची हाक दिली आहे... त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील पंधराशे पेक्षा अधिकच्या शाळा बंद आहेत... शिक्षकांना अशैक्षणिक कामे नको यासह विविध प्रकारच्या 14 मागण्यांसाठी शिक्षकांनी यलगार पुकारात अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरून विराट महामोर्चा काढलाय... अमरावती जिल्ह्यातील हजारो शिक्षक या मोर्चात सहभागी झालेय..
जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदारांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि आणि अधिकारी उपस्थित होते या बैठकीत 35 विभागांपैकी अवघ्या 13 विभागाचा वतीने माहिती दिली मात्र उर्वरित बावीस विभागाच्या वतीने माहिती न देण्यात आल्याने जिल्हाधिकारी आणि खासदार यांनी बैठक स्थगित करत पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीनंतर खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे योजनांचे पूर्ण माहिती न देणे म्हणजे योजनांमधील गैर्यवहार लपवण्याचा प्रकार असल्याचाही शंका व्यक्त केली जात आहे...
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आज सांगलीच्या दौऱ्यावर आहे.मिरज या ठिकाणी यांचे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडत आहे.जिल्ह्यातील सामाजिक समस्या व प्रश्न यावर राज्यपाल राधाकृष्णन हे चर्चा करणार आहेत आणि जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.त्याचबरोबर काही नागरिकां सोबत देखील राज्यपाल चर्चा करणार आहेत.मात्र या ठिकाणी माध्यमांना कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे
डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात करण्यात आलेल्या बॅनरबाजी नंतर डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट भाजप मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडी पुन्हा उघड झाल्या असून यानंतर डोंबिवली राजकारण चांगलंच तापलं आहे.बॅनर प्रकरणी पोलीस ठाण्यात दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना नोटीस बाजवली होती. याबाबत विचारपूस करण्यासाठी दीपेश म्हात्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकानी पोलीस स्टेशन बाहेर एकच गर्दी केली होती..
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आज मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राजेभाऊ फड हे परळीतील आहेत. तसेच रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत.. राजाभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत..
फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. अशातच त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होत असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजेभाऊ फड यांचे आव्हान असणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड - परळी महामार्गावरील तेलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केला जातोय. यावेळी मराठा समाजाकडून अनोखे आंदोलन करत लक्ष वेधण्यात आले. महामार्गावर श्वानांच्या गळ्यात छगन भुजबळ, नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्या नावाच्या पाट्या अडकवून आंदोलन केले जात आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. मध्यरात्री समाज बांधवांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन घेतली. मात्र प्रकृती खालावत असताना देखील राज्य सरकार या उपोषणाची गंभीर दखल घेत नसल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. बीड परळी महामार्गावर रास्ता रोको करत राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाची आज बैठक झाली त्यामध्ये उद्या पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. बंद शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशभरात रेल्वे रुळावर सिलिंडर, खांब, दगड ठेवून अपघात घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने चिंता व्यक्त होत असताना छत्रपती संभाजीनगरात अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडालीये.रेल्वे रुळावर सिमेंटचे ढापे,दगड ठेवलेले असले तरी सुदैवाने ताशी १०० किमीच्या वेगाने धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला.ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजता लाडगाव-करमाड शिवारात घडली.
नंदीग्राम एक्स्प्रेस रात्री छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे रवाना झाली. रेल्वे रात्री १ वाजता लाडगाव-करमाड शिवारातील उड्डाणपुलाखालून जातांना चालकाला रुळावर सिमेंटचे ढापे,सिमेंटचे दगड ठेवल्याचे दिसले. ताशी १०० किमीचा वेग असल्याने ब्रेक लागेपर्यंत रेल्वेने दगडांना उडविले. जोरदार आवाज झाल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. दगड ठेवलेल्या जागेपासून २०० मीटरवर जाऊन ही रेल्वे थांबली. धडकेमुळे रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला सिमेंटच्या दगडांचे तुकडे पडले होते. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन रेल्वे पुढे रवाना झाली.
मिरा भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई केली आहे.रुग्णांचा आवश्यक तपशील न ठेवल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत मिरा-भाईंदर मधील ९ सोनोग्राफी केंद्रांचे नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.यात बड्या रुग्णालयांसह सोनोग्राफी केंद्रांचा देखील समावेश आहे. मिरा-भाईंदर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.विशेष बाब म्हणजे शहरातील प्रसिद्ध रुग्णालय भक्ती वेदांतचा देखील समावेश आहे.
धुळे शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, रात्री जवळपास एक ते दीड तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आल्याचे बघायला मिळाले आहे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नागरिकांची व ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली, धुळे तालुक्यातील नगाव, धमाने, कापडने या परिसरामध्ये नागरिकांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले आहे, त्याचबरोबर रस्त्याला नदी नाल्याचे स्वरूप आल्याचे बघावयास मिळाले आहे,
राज्य महामार्ग महामंडळाच्या शिवाजीनगर आगारातून सुटणार बसेस
नवरात्र उत्सवात चार व सत ऑक्टोबरला दोन बसेस सोडण्यात येणार
भाविकांसाठी बस चे ऑनलाईन ॲडव्हान्स बुकिंग सुरू
साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी २६७५ रुपये इतके तिकीट
तुळजापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी गड अशा ३ ठिकाणी ही बस जाणार
भाविकांना राहण्याचा, जेवण, दर्शन पासचा खर्च स्वतःला करावा लागणार
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड मध्ये मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले.अर्धापूर ते परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला आहे.नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे हे आंदोलन सुरू आहे.मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची तब्बेयत खालावत चाली आहे.परंतु अद्याप सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाहीय.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अर्धापूर ते परभणी हा महामार्ग या मराठा आंदोलकांनी रोखून धरला आहे.या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पार्टीची ताकद वाढावी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून यावेत, यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
लातूर जिल्हा भरात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आहे. काल सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल आहे.. लातूरच्या मुरुड ,औसा ,लातूर शहर ,रेनापुर यासह इतर भागात देखील पावसाने प्रचंड मोठ नुकसान केल आहे.. तर लातूर शहरातल्या जलसिंचन भवन कार्यालयात पाणी शिरल्याने संपूर्ण कार्यालयात पाणी तुंबलं आहे.. दरम्यान पाण्यामुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र आणि जुनी रेकॉर्ड भिजली आहेत.
महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनीधींना जाणीवपूर्वक पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून व मंजूर कामांतून वगळण्यात आल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे,पुरंदर चे आमदार संजय जगताप आणि हवेलीच्या आमदार अशोकबापू पवार आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर
मुंबईत ऐकणार विविध संस्था-समाजघटकांची मतमतांतरे
वक्फ विधेयकावर संसदेची संयुक्त समिती गेले अनेक दिवस अभ्यास, चर्चा करत आहे
देशभरातून १.२ कोटींहून जास्त मत-मतांतरे समितीला प्राप्त झाली आहेत
धनगर आरक्षण आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आज विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सहा ही उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज नगरकडे रवाना झाले. छत्रपती संभाजी महाराज नगर येथील जातपडताळणी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिपक बोराडे,माऊली हळणवर, योगेश धरम आदी आंदोलनकर्ते रूग्णवाहिकेतूनच रवाना झाले.
अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये रस्त्यांवर तुंबले पाणी
- अवघ्या काही तासांच्या पावसाने शहरात वाहतूक देखील विस्कळीत..
- केंद्रीय गृहमंत्री शहरात येणार असताना देखील नियोजन ढासळले...
- द्वारका परिसरात पाणी साचले, तर मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी
- नियोजन शून्य कारभाराचा नाशिककरांना देखील फटका
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मंगळवारी जाऊन भेट घेतली. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास राजेश टोपे अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात गावगुंडांनी पंधरा-वीस वाहनांची केली तोडफोड केली आहे. तर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावगुंडाने चार-पाच वाहनांची केली तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बुलढाणा-नागपूर या महामार्गावरील रोहना गावाजवळील रोहना नदीला पूर आला असून 2 तासापासून वाहतूक खोळंबली आहे. या पावसाने तालुक्यातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
भंडारा जिल्ह्यात काही दिवसाआधी आलेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठावरील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात करपा हा रोग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धान पिकाला याचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात धान पीक देखील जमीन दोस्त झालेले आहेत. नदी काठावरील शेकडो एकर शेतशिवारात करपा लागल्याने अगदी कापणीवर आलेले धानपिक सुकत चाललेले आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव गेत दरड हटवण्याचे काम केले. रात्री १ वाजेनंतर वाहतूक पूर्वरत झाली.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरमधील 6 जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मोठ्या उत्साहात मतदान पार पडतंय. दुसऱ्या टप्प्यात 25.78 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांपैकी 15 जागा मध्य काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. औसा तालुक्यातील उजनी परिसराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी गावातल्या बाजार चौकात पाणी साचले आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.