Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: पंढरपुरात दोन गटात तुफान हाणामारी; टाकळी गावातील घटना

Maharashtra Breaking News Live Updates : आज रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, देशातील राजकीय घडामोडी, लाडकी बहीण योजना अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Satish Daud

Pandharpur Crime:  पंढरपुरात दोन गटात तुफान हाणामारी; टाकळी गावातील घटना

पंढरपुरात दोन गटात तुफान हाणामारी झालीय. पंढरपूर शहरानजीक असलेल्या टाकळी गावातील ही घटना घडलीय. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात तुफान हाणामारी झाली. शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे टाकळी गावचे सरपंच संजय साठे यांनी तलवारीने मारहाण केल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचा आरोप आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मारहाणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सात ते आठ कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. तलवार रॉड बंदुकीने हल्ला केल्याचा आरोप जखमींनी आरोप. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.पंढरपूर शहर आणि परिसरात तणावाचे वातावरण.....

Leopard Attack: अहमदनगरमध्ये नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ; तीन वर्षीय चिमुरड्यावर हल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झालाय. राहाता तालुक्यातील चितळी गावात घटना घडलीय. घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय प्रथमेश वाघ याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याचा बळी. वारंवार पत्र देऊनदेखील वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. अनेक दिवसांपासून चितळी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होत आहे.

Pune Rain:  पुण्यात मुसळधार पाऊस, टिंबर मार्केट परिसरात भरलं पाणी

संध्याकाळी झालेल्या पावसाने नागझरी ओढ्याला पुर आला.त्यामुळे पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले.अनेक दुकानांमध्ये पाणी गेल्याने लोकांचें नुकसान देखील झालंय.आता पुण्यातील पाऊस थांबला आहे. जवळपास एक ते दीड तास पावसाने पुणे शहराला झोडपले अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले होते.

Chhatrapati Sambhajinagar:   छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून मायलेकीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे धक्कादायक घटना घडलीय. वीज पडून मायलेकींचा मृत्यू झालाय. रेणुका हरिदास राऊत व स्वाती हरिदास राऊत अशी याची नावे आहेत.

Buldhana : आमदार संजय गायकवाडांसह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून इतरांना तलवारीनेच केक भरविल्याच प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय गायकवाडांसह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Pune Rain:  पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळित

पिंपरी-चचवड शहरात मागील वीस मिनिटांपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. धुवाधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने पिंपरी चिंचवड शहराला ऑरेज अलर्टचा इशारा दिला होता. मात्र पिंपरी चिंचवड शहरात सध्या रेड अलर्ट सारखा पाऊस पडत आहे.

Mumbai Mhada: म्हाडाची बनावट वेबसाईट बनवल्या प्रकरणी दोघांना अटक

बनावट संकेतस्थळ बनवणारा कल्पेश सेवक आणि म्हाडाचा अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या अमोल पटेल नावाच्या दोघा आरोपींना अटक करण्यात आलीय. बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांना लाखोंचा गंडा या दोघांना घातलाय. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०३० घरांची लॉटरी जाहीर करताच बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणुकीचा घाट घातला.

Thane Politics: मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच महायुतीला तडा,शिवसेना उपनेत्याची अपक्ष लढण्याची तयारी

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच महायुती मध्ये जागा वाटपावरून पहिला मिठाचा खडा पडणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धारच व्यक्त केलाय. पक्षाने तिकीट न दिल्यास थेट अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी खाजगीत स्पष्ट केले आहे.

CM Shinde : लाडकी बहिण योजनेचे पैसे नको तर हक्काच घर हवं; BIT चाळीतील महिलांची सीएमकडे मागणी

BIT मधील रहिवाशी महिलांनी हक्काच्या घरासाठी अनोखं आंदोलन केलं. लाडकी बहिण योजनेचे पैसे नको तर हक्काच घर हवं. राखी आणि आरतीच ताट हातात घेऊन लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय. रक्षा बंधनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींच साकडं घातलं. मुंबई सेंट्रल येथील BIT चाळीतील रहिवाशी महिलांनी हे आंदोलन करत मागणी केलीय. BDD चाळीसंदर्भात सरकारने जसे धोरण ठरवले तसे धोरण ठरवून BIT चाळीचा विकास करण्याची रहिवाश्यांची मागणी आहे.

Assembly Election :  शिर्डी विधानसभेसाठी ठाकरे गट आग्रही; विखे पाटलांविरोधात निष्ठावंताला उमेदवारी देण्याची मागणी

महाविकास आघडीत शिर्डी विधानसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी आणि विखे पाटलांच्या विरोधात ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकालाच संधी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिर्डीत मेळावा घेत यंदा विखे पाटलांना पडायचेच असा निर्धार केलाय.

Pune News: रेल्वे पोलिसाने वाचवले प्रवाशाचे प्राण, पुणे रेल्वे स्थानकावरील घटना 

पुणे रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशांचा जीव वाचवण्यात आलाय. धावत्या गोरखपूर एक्स्प्रेस रेल्वेमध्ये चढताना प्रवासी घसरून पडला होता. मात्र रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याने तत्काळ प्रवाशाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला

Pune News: महायुतीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचा बहिष्कार

महायुतीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाने बहिष्कार टाकलाय. विश्वासात घेतलं जात नाही, लाडकी बहीण योजनेच्या नावावरुन मुख्यमंत्री शब्द वगळल्याने नाराजी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठकीत संवाद सुरू आहे.

Nagpur News: नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या वतीने रोजगार मेळावा, संजय राऊत करणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच वेळात उबाठाचे नेते संजय राऊत या कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्यांच्या हस्ते रोजगार प्राप्त मुलांना नियुक्ती पत्र तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल.

Mumbai News: लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर हक्काचं घर हवं, मुंबईत महिलांचे आंदोलन

लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर हक्काचं घर पाहिजे. राखी आणि आरतीचं ताट हातात घेऊन लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलंं. मुंबई सेंट्रल येथील BIT चाळीतील रहिवाशी महिलांनी मागणी केली.

Indapur News: नितेश राणे यांच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांचा विरोध

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा सरदार वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात असलेल्या ऐतिहासिक गढीवरील झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असून याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शवला.. राणे यांचा मोर्चा नेहरू चौकातून मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सकल मराठा समाजाच्या आंदोलन जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले जवळपास दहा आंदोलकांना ताब्यात घेतले..

Pune News: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण १०० टक्के भरले

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण १०० टक्के भरलं. धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले आहे. या धरणातून पुरंदर तालुक्यासह बारामतीतील 50 गावांना पाणी दिलं जातं. हे धरण पावण टी एम सीच आहे. या पावसाळ्यामध्ये हे धरण पहिल्यांदाच भरला आहे. या धरणाच्या बाजूला काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्यामुळे पाणीसाठा वाढला.

Nanded News: ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हक्के यांचे नांदेडच्या भोकरमध्ये जंगी स्वागत

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रा लक्ष्मण हक्के हे महाराष्ट्र भर दौरे करीत आहेत. आज हक्के यांनी नांदेडच्या भोकर येथे आयोजित ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यासाठी हाजेरी लावलीय.हक्के यांचे भोकर येथे ओबीसी बांधवानी मोठया जल्लोषात स्वागत केले.जेसीबीच्या साह्याने हक्के यांना मोठा हार घालण्यात आला.भोकर शहरातून ओबीसी जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Satara News: लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उदयनराजे भोसलेंची अनुपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या माझी लाडकी बहिण योजनेच्या वचनपुर्ती कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती. साताऱ्यात कार्यक्रम असूनही उदयनराजे भोसले कार्यक्रमात उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण. नक्की कशामुळं उदयनराजे अनुपस्थित याबाबत चर्चा

Maharashtra Politics: CM शिंदेंचे माजी खासगी सचिव उतरणार विधानसभेच्या रिंगणात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी खतगावकर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता? खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वीच खतगावकर आपल्या खासगी सचिव पदाचाही राजीनामा दिला असून ११ ऑगस्ट ला नांदेडच्या मुखेड मतदार संघात बालाजी खतगावकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयचं उद्घाटन केलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनाला मंत्री शंभुराजे देसाई हे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या कामांशी प्रभावित होऊन खतगावकर समाजकारणात उतरत असल्याची चर्चा आहे.

Pune News: आशा बुचके यांची प्रकृती खालावली; सत्यशिल शेरकर यांनी घेतली भेट 

जुन्नर तालुक्यातील भाजपा नेत्या आशा बुचके यांची प्रकृती खालावली. रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. जनसन्मान यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवत त्यांनी जोरदार घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर त्रास जाणवल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची महाविकास आघाडीतील काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांनी भेट घेतली.

Gondia News: गोंदियातील महिलांनी पाठवल्या CM शिंदेंना राख्या

गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी पाठविल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या! लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याने महिलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मानत हेच मुख्यमंत्री राहो असा आशीर्वाद त्यांनी दिला. राखीप्रमाणे दिवाळीला ओवळणीत अशीच भेट मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

Pune News: काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या पुणे सत्र न्यायालयात उपस्थित राहणार?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्य प्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले होते.कलम 204 अन्वये हे आदेश देण्यात आले होते. राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन येथील भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता.

Nandurbar News: राखी खरेदीसाठी लगबग; लाडक्या बहिणींची बाजारपेठांमध्ये गर्दी

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पैसे खात्यावर आल्यानंतर काल जिल्हाभरातील बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यातच उद्या रक्षाबंधन असल्याने आपल्या लाडक्या भावासाठी राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी होतानाचे चित्र नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पाहायला मिळत आहेत आकर्षक आणि फॅन्सी राख्यांची बहिणीकडून मोठी मागणी असून 5 रुपये पासून ते 500 रुपये पर्यंतच्या राख्या सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध असून विविध प्रकारच्या रंगबिरंगी आणि आकर्षक राख्यांनी भरलेल्या बाजारात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहेत....

Pune News: कोलकातामधील घटनेच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे आंदोलन

कोलकाता येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि अमानुष अत्याचारांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक तासाचे मुक आंदोलन करण्यात आलं. तोंडावर काळी फित बांधून कार्यकर्त्यांनी हे निदर्शन केलं. पुणे रेल्वे स्टेशन जवळील असलेल्या महात्मा गांधी पुतळा यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

Supriya Sule News: खासदार सुप्रिया सुळे यांचे जेसीबीवरून फुलांची उधळण करून व तुतारी वाजवून स्वागत

खासदार सुप्रिया सुळे या आज धुळे दौऱ्यावर आहेत, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सुप्रिया सुळे यांचे जेसीबीवरून फुलांची उधळण करून व तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले आहे,

Ahmednagar News: जय पवारांचा कर्जत दौरा; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी कर्जतचे ग्रामदैवत गोंदड महाराजांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी साधला संवाद. कर्जतमध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच यापुढे लोकांनी बोलवलं तर नक्की पुन्हा येईन असेही ते म्हणाले.

Beed News: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी शहरामध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवासाठी, कृषी विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे. तर याच तयारीची पाहणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केली आहे. दरम्यान यावेळी धनंजय मुंडे यांनी सर्व पेंडॉलची पाहणी करत, येणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांची गैरसोय होऊ नये, याविषयीच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत.

Pune News : पुण्यात मराठा समाजाची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तात्काळ बैठक

पुण्यात मराठा समाजाची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तात्काळ बैठक बोलवण्यात आली आहे. पुण्यातील आठ ही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहे. बैठकीचा आढावा आणि उमेदवारांची माहिती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार तात्काळ पुण्यात ही बैठक घेण्यात येणार आहे. आज दुपारी ही बैठक होणार आहे.

Ajit Pawar News : अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा कर्जत दौरा

अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार कर्जत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काही कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात जय पवार यांचा अचानक दौऱ्याने राजकीय चर्चांना उधान आलंय.

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी 

१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झालीय. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आज रविवारी पहाटे पाचपासून भाविकांच्या रंगाचा रांगा लागल्या आहेत.

Ulhasanagar News : उल्हासनगरात रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार

उल्हासनगरमध्ये एका रिक्षाचालकाच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. उल्हासनगरच्या माणेरे गावात ही घटना घडली. या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

Buldhana News : महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट , बुलढाण्यात तणाव 

तीन दिवसापूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समर्थन करणारा व्हिडिओ व रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात एका युवकाने फेसबुक पोस्ट केल्याने बुलढाण्यात तणाव निर्माण झाला होता. या युवकावर कारवाई करण्यासाठी जवळपास 400 ते 500 युवक मध्यरात्री बुलढाणा शहर पोलीस स्टेशनवर चालून आले होते. त्यांनी शहर पोलीस स्टेशनला घेराव घालत युवकावर कारवाईची मागणी केली.

OBC Reservation :  नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याची जय्यत तयारी

नांदेडच्या भोकरमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या ओबीसी मेळाव्याला प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्यासह ओबीसी नेते हजेरी लावणार आहेत. मेळाव्याला एक वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान भोकर शहरातून ओबीसी बांधवाची भव्य रॅली निघणार आहे. या रॅलीचा समारोप भोकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे. हजारो ओबीसी बांधव या आरक्षण बचाव मेळाव्याला उपस्थित राहतील, असा दावा आयोजकांनी केला आहे.

Pune News : पुण्यात डॉक्टरांचा निषेध मूक मोर्चा

पुण्यात सिंहगड रोडवरील डॉक्टर्स असोसिएशने कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या क्रूर अमानुष अत्याचार व खुनाच्या निषेधार्थ आज मुक मोर्चा काढला. आज सकाळी आंदोलन करण्यात आले. उंबऱ्या गणपती चौकापासून ते वडगाव ब्रिजपर्यंत शांततापूर्ण मुक मोर्चा काढण्यात आला.

Pune News : पिंपरी चिंचवड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा

बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात आज पिंपरी चिंचवड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जाती-धर्मा तील हिंदू बांधव सहभागी होणार आहेत. हातात भगवा झेंडे घेऊन. हजारो हिंदू बांधव या मोर्च्यात सहभागी झाले आहेत चिंचवड येथील लहुजी वस्ताद स्मारकापासून पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Sharad Pawar News: बारामतीत शरद पवारांची विद्या प्रतिष्ठानची बैठक

शरद पवार आज बारामतीत आहेत. शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या बैठकीसाठी हजेरी लावली आहे. आज विद्या प्रतिष्ठानची बैठक आहे. या बैठकीला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी देखील हजेरी लावली आहे. शरद पवार आज विद्या प्रतिष्ठानचा शैक्षणिक आढावा घेणार आहेत.

Pune News : पुण्यातील वाघोली परिसरात टोळक्याने गाड्या पेटवल्या; 4 जणांविरूद्ध गुन्हा 

पुण्यातील वाघोली परिसरातील धक्कादायक प्रकार घडलाय. वाघोली परिसरात टोळक्याने गाड्या पेटवल्या. चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहशत माजवण्याच्या हेतुने गाड्यांची जाळपोळ करण्यात आलीय.

Badlapur News : बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार

बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय.

Buldhana News : रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मुस्लिम समुदाय आक्रमक

रामगिरी महाराज यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.. रामगिरी महाराज यांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या मोर्चेकरी मुस्लिम समुदायने केलीय .. महाराजांच्या वादग्रस्त विधानांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय

Beed News : मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली

बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मांजरा नदीला काल पूरस्थिती आली होती. आणि आजही ही नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळं बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

गेल्या 24 तासात या धरणातील जिवंतपाणी साठ्यात जवळपास 1 टक्क्याने वाढ झाली आहे. दरम्यान मांजरा धरणातून बीड, धाराशिव, लातूर या 3 जिल्ह्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळं या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Pune News : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने हा पाणीसाठा ६ टक्के जास्त आहे.

पुण्यातील धरणात सध्या असलेला पाणीसाठा

खडकवासला: 79.11 टक्के

पानशेत: 99.12 टक्के

टेमघर: 100 टक्के

वरसगाव: 97.97 टक्के

Beed News : बीडच्या माजलगावमध्ये महिलांचा कँडल मार्च

कोलकता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि केलेल्या हत्येच्या निषेधार्थ, बीडच्या माजलगावमध्ये सर्व क्षेत्रातील महिलांनी एकत्र येत, कॅंडल मार्च काढला. शासनाने यातील नराधम आरोपींना कठोर शिक्षा करावी, त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षीततेसाठी शासनाने कडक कायदा करावा, ही मागणी घेऊन हा कॅडल मार्च काढला होता. दरम्यान या कॅडल मार्चमध्ये शहरातील प्रतिष्ठीत महिला डॉक्टर तसेच इतर महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Kolhapur News : कोल्हापुरातील आंबा घाटात आढळले 2 तरुणांचे मृतदेह, खळबळजनक घटना

कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटातील खोलदरीत 2 तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यातील एक तरुण हा सांगलीतील तर दुसरा तरुण निपाणी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT