CCTV surveillance exposed mass copying during Maharashtra board exams, leading to suspension of 81 teachers and staff across multiple districts saam tv
महाराष्ट्र

राज्यात मोठी कारवाई; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Maharashtra Board Exam Mass Copying Case 2026: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांमध्ये सीसीटीव्हीमुळे मास कॉपीचे प्रकार उघड झाले असून राज्यभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

इयत्ता दहावी आणि बारावीच्या झालेल्या परीक्षेत यंदा सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पुराव्यासह मास कॉपीचे प्रकार उघड झाले. या प्रकरणात आतापर्यंत 81 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे, अशी माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या झालेल्या बोर्ड परीक्षेत बीड जिल्ह्यामध्ये चौसाळा येथे कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र क्रमांक 224 मध्ये कॉपी झाल्याचे उघडकीस झाले होते. प्रशासनाने येथील 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करत निलंबित केले. पहिल्याच पेपरला (दि,10 फेब्रुवारी) हा प्रकार घडला होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय जैतापुर येथे केंद्र क्रमांक 0079 येथे मास कॉपीचा प्रकार घडला. यामध्ये पर्यवेक्षक केंद्र संचालक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचे सीसीटीव्हीवरून निदर्शनास आल्याने या 24 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि 21 जणांना निलंबित केले. तसेच जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एक दोन केंद्रावर इंग्रजी विषयाच्या पेपरला विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली असून पर्यवेक्षक म्हणून नियुक्त 5 शिक्षकांवर कारवाई केली आहे.

गडचिरोली येथील एका केंद्रांवर राज्यशास्त्र विषयाच्या मायक्रोनोट आणि चॅट जीपीटी प्रिंट आउट काढलेल्या आणि सामूहिक कॉपी प्रकार दिसून आला होता. या प्रकरणी तीन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करत या सर्वांना निलंबित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT