दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
महाराष्ट्र राज्य मंडळाचा दहावी बारावी परीक्षा शुल्काबाबत मोठा निर्णय
२६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश मिळेपर्यंत परीक्षा शुल्क आकारू नका, असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिलेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २६५ तालुक्यांमध्ये विशेष बाब म्हणून उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारच्या निर्णयानुसार फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात याव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास तातडीने सादर करावा, अशा आदेश राज्य मंडळाने दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.