MAHARASHTRA ATS CRACKDOWN: MULTI-CITY RAIDS, AKOLA SUSPECT DETAINED Saam Tv
महाराष्ट्र

ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन, राज्यात ATSची एकाचवेळी १५० ठिकाणी छापेमारी, ६ जण ताब्यात

Maharashtra ATS raids over Shahzad Bhatti links : महाराष्ट्र एटीएसने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथे १५० ठिकाणी छापेमारी करत पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित डिजिटल संपर्काच्या तपासात ६ जणांना ताब्यात घेतले आहे.

Namdeo Kumbhar

Chhatrapati Sambhajinagar ATS operation latest news : मराठवाड्यात एटीएसच्या (ATS) संभाजीनगर युनिटने एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक कारवाई केली आहे. थेट पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी (Shahzad Bhatti) याच्याशी संबंधित ही कारवाई करण्यात आली. एटीएसने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एकाच वेळी १५० ठिकाणी धाडसत्र राबवले आहे. या कारवाईदरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

'युझर आयडी'वरून संपर्काचा संशय; १४ जणांचा शोध सुरू

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया/डिजिटल युझर आयडीवरून महाराष्ट्रातील काही तरुण संपर्क साधत होते. एटीएसच्या रडारवर असे एकूण १४ जण आहेत, ज्यांनी या आयडीवरून संवाद साधला होता. सध्या या १४ जणांचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक ठिकठिकाणी छापे टाकत आहे. या संशयितांपैकी ६ जणांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात एटीएसला यश आले असून, सध्या त्यांची अज्ञात स्थळी चौकशी केली जात आहे.

एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे

एटीएसच्या या गुप्त आणि धडक कारवाईमुळे मराठवाड्यात मोठी खळबळ उडाली आहे. संशयितांचे जाळे कुठे कुठे पसरले आहे, याचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक जालना आणि बीडमध्येही समांतर तपास करत आहे. पुढील चौकशीत आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र एटीएसने एकाचवेळी १५० ठिकाणी छापे टाकत तपास सुरू केला आहे.

मराठवाड्यात हाय-अलर्ट, तपासाची चक्रे वेगवान

या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. हा केवळ सोशल मीडियावरील संपर्क आहे की त्यामागे काही मोठा कट रचला जात होता? गँगस्टर शहजाद भट्टीच्या माध्यमातून भारतात काही घातपात घडवण्याचा डाव होता का? या सर्व बाजूने एटीएसचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: खड्ड्यांवरून ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांची बाचाबाची, नाशिक महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा

खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

VIDEO : पुलावरील रस्त्याला भेगा, एका बाजूच्या भिंतीला तडे...मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास धोकादायक

बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ! अवघ्या ५ मिनिटांत बनवा फ्लॉवरची गरमागरम भजी

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये युवक काँग्रेसकडून खासदार कंगना रनौत यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न,रस्त्यावर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT