chandrakant patil udhv thackeray  saamtv
महाराष्ट्र

Chandrakant Patil: 'भीकं मागणं शब्द प्रबोधनकार ठाकरेंचाच' उद्धव ठाकरेंना चंद्रकात पाटलांनी थेट पुस्तकचं दाखवलं

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दालनात जाऊन भेट घेत त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे माझी जीवनगाथा हे पुस्तक भेट दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Assembly Winter Session : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी फुले आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे विधान केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याबद्दल विरोधी पक्षांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला होता.

मात्र चंद्रकांत पाटील यांनी नागपुर अधिवेशनादरम्यान भीक मागितली हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचाच असल्याचा पुरावा उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यांनी उध्दव ठाकरेंना प्रबोधनकारांचे एक पुस्तक दाखवले आहे. या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनासाठी माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) नागपुरात दाखल झाले आहेत. याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे माझी जीवनगाथा हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असा उल्लेख असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवले.

त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षातील प्रमूख नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्टिकरण दिले. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

काय बोलले होते चंद्रकांत पाटील?

पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन हा वाद सुरू झाला होता. या कार्यक्रमात त्यांनी "शाहू फुले आंबेडकरांनीही शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करण्यासाठी त्यांना सरकारने अनुदान दिले नाही तर त्यांनी लोकांकडे भिक मागून शाळा सुरू केल्या," असे विधान केले होते. ज्यानंतर या वादाला सुरूवात झाली होती.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला गेला होता. पिंपरीमधील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्यावर आंबेडकरी संघटनांकडून शाईफेकही करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! आरसीबीच्या खेळाडूंचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT