eknath shinde and uddhav Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: मैं खामोश हुं, क्योंकी सब जानता हूं! विधानसभेत CM शिंदेंची जोरदार बॅटिंग, उद्धव ठाकरेंवर केली सडकून टिका

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. आजच्या दिवशीच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Asssembly Winter Session: राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. आजच्या दिवशीच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाण्यास महाविकास आघाडीच कारणीभूत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर त्यांनी महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली. (Eknath Shinde)

एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. ज्यामध्ये त्यांनी "मुख्यमंत्री हेलिकोट्र मधून शेतीत जातो म्हणून मला हिणवण्यात आले,टोमणा मारला, पण अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा,बक्षीस मिळवा" अशी टिका त्यांनी यावेळी केली. राज्याबाहेर प्रकल्प जाण्यासाठी आधीचे सरकारचं जबाबदार आहे असेही ते म्हणाले. एकजण चुकेल पण पन्नास आमदार कसे चुकतील असे म्हणत त्यांनी सत्ता स्थापनेबद्दलही ठाकरेंवर टिका केली.

"प्रबोधनकारांनी अंधश्रद्धेला विरोध केला त्याच प्रबोधनकारांचे वारसदार लिंबू-टिंबूची भाषा बोलायला लागले. आम्हाला वर्षा बंगल्यावरही लिंबू सापडले अशीही टिका यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले," याबद्दल आत्मचिंतन करुन चूक कोणाची स्वतः ला विचारा असा सल्लाही यावेळी त्यांनी ठाकरेंना दिला. त्याचबरोबर 'जे घरातून बाहेर पडत नाहीत ते हिंमत दाखवण्याची भाषा करतात, हा मोठा विनोद आहे', असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी आधीच्या सरकारने हुकूमशाही करत अनेकांना अटक केल्याचाही आरोप केला. नवनीत राणा, अर्नब गोस्वामी, कंगणा रणौत यांच्या नावाचा उल्लेख करत विनाकारण त्रास दिला ही सत्तेची मस्ती नाही का असा सवाल त्यांनी विचारला. त्याचबरोबर मै खामोश हूं क्यूंकी सब जानता हूं असा इशाराही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना (Udhav Thackeray) दिला. दरम्यान, हे शिंदे सरकार दडपशाहीचे सरकार नसून जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हालाच बहुमत दिल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT