Wardha Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Assembly Election Exit Poll : उद्या विधानसभा निवडणुकीचा निकला जाहीर होणार आहे. यंदा वर्धा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा पंकज भोयर आमदार होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. परंतु त्याआधीच कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, वर्ध्यामध्ये पंकज भोयर हे संभाव्य आमदार आहेत.

वर्ध्यामध्ये भाजप आपला गड राखणार असल्याचे दिसत आहे. वर्ध्यामध्ये पंकज भोयर विरुद्ध काँग्रेसचे शेखर शेंडे अशी लढत होती. या लढतील भाजप जिंकणार असल्याचे दिसत आहे. पंकज भोयर हे मागील दोन टर्मपासून आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा जनता त्यांना साथ देईल, असं सांगण्यात येत आहे.

वर्ध्यामध्ये बंडखोर उमेदवारांनीदेखील अर्ज दाखल केले होते. त्यामुळे वर्ध्याचे राजकारणाची चर्चा सर्वत्र होती.पूर्वी वर्धा या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु २०१४ नंतर काँग्रेसचे वर्चस्व हळूहळू कमी होताना दिसत आहे.या निवडणुकीत भाजपने तिसऱ्यांदा पंकज भोयर यांना उमेदवारी दिली आहे. पंकज भोयर हे सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याची शक्यता आहेत. (Wardha Assembly Election)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT