napur Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Breaking : नागपुरात मतदानानंतर मोठा राडा; EVM मशीन घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड

Nagpur Breaking News : नागपुरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मोठा गोंधळ झाला आहे. नागपुरात EVM मशीन घेणाऱ्या जाणाऱ्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

नागपूर : महाराष्ट्रात मतदानावेळी राडा झाल्याच्या घटनाने दिवसभर वातावरण तापलेले होतेच. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही वातावरण निवळलेलं नाही. नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावरच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ईव्हीएम घेऊन जाणारी कारवर हल्ला करत तोडफोड केली आह. नागपूर मध्य मतदारसंघातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान, दुपारी बीडमध्ये ईव्हीएम फोडल्याची धक्कादायक घटनाही घडली होती.

नागपुरात अत्यंत गंभीर घटनेत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून जेव्हा ईव्हीएम घेऊन जाणारी तवेरा गाडी मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं समजतेय.

ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला झाला त्यावेळेस परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांना बोलावले. मात्र तोवर दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत evm घेऊन जाणाऱ्या तवेरा गाडीची जबर तोडफोड करण्यात आली होती.

पोलिसांनी माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि ईव्हीएम तसेच तवेरा गाडी मधील सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. मोडतोड करण्यात आलेली तवेरा गाडी पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणली असून ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित रित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवले आहे.

या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते गोळा झाले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस स्टेश कडे धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना तिथून हाकलून लावले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून कऱण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Aarakshan: मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल! बिस्कीट खाऊन भागवली भूक | VIDEO

Success Story: एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार ते IPS अधिकारी; अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; ५ राशींचे लोक संधीचं सोनं करणार, वाचा

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

SCROLL FOR NEXT