Mahayuti and Mahavikas Agahadi Members Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Mahayuti Vs Mahavikas Aghadi: राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये दिग्गज नेते आघाडीवर आहेत. राज्यातील ज्या मतदारसंघामध्ये भाजप- शिंदे गट येण्याची शक्यता आहे त्याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसत आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी कोणाला बहुमत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरूवातीच्या कलानुसार महायुती आघाडीवर आहे. महायुती १५४ जागांवर आघाडीवर असून बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडी १२० जागांवर आघाडीवर आहे.

राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये दिग्गज नेते आघाडीवर आहेत. राज्यातील ज्या मतदारसंघामध्ये भाजप येण्याची शक्यता आहे त्याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसत आहे. बारामतीमध्ये अजित पवार आघाडीवर आहेत तर युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. माहीम मतदारसंघामध्ये महेश सावंत आघाडीवर आहेत तर अमित ठाकरे पिछाडीवर आहे. वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत.

महायुती - १५४ जागांवर आघाडीवर -

भाजप - ९२

शिवसेना शिंदे गट - ३१

राष्ट्रवादी अजित पवार गट - ३१

महाविकास आघाडी - १२० जागांवर आघाडीवर -

काँग्रेस - ४८

शिवसेना ठाकरे गट - ३२

राष्ट्रवादी शरद पवार गट - ४०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Liquor Ban : सलग ४ दिवस दारूचे दुकान बंद राहणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

Bank Scam: SBI च्या ग्राहकांनो सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय? सेकंदातच होईल अकाऊंट रिकामं

SCROLL FOR NEXT