Ajit Pawar On Maharashtra Assembly Election Result 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: राज्यात लाडक्या बहिणींनी मतं दिली, सर्वांचेच अंदाज चुकले; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result 2024: 'राज्यात लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मते दिल्याने सर्वांचेच अंदाज चुकले.', असे मत व्यक्त करत अजित पवारांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले

Priya More

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय झाला आहे. अजित पवार यांनी त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते. अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील राज्यात ४० जागांवर आघाडीवर आहे.

तर महायुती राज्यात २२६ जागांवर आघाडीवर आहे. महायुतीला मिळालेल्या यशानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यात लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मते दिल्याने सर्वांचेच अंदाज चुकले.', असे मत व्यक्त करत अजित पवारांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'राज्यात लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मते दिली. त्यामुळे सर्वांचेच अंदाज चुकले. राज्य सरकारने ज्या कल्याणकारी योजना राबविल्या त्याचे प्रतिबिंब या मतदानाच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. राज्यामधील तमाम मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. राज्यातील जनतेने जो विश्वास दाखविला आहे. त्याला पात्र ठरुन राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचेच काम महायुती करणार आहे.'

'विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि महाराष्ट्राच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीवर जो विश्वास दाखविला तो अविश्वसनीय आहे. राज्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचा राज्यात मोठा विजय मिळाला.', असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

तसंच, बारामतीच्या मतदारांनी जो विश्वास दाखविला त्याबद्दल देखील अजित पवारांनी आभार मानले. अजित पवार यांनी पुढे सांगितले की, 'गेल्या काही वर्षात बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी जे काम केले होते. त्याची पावतीच मतदारांनी दिली आहे. बारामतीकरांनी कायमच प्रेम दाखविले त्यामुळे आठव्यांदा आता विधानसभेमध्ये मला बारामतीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT