Maharashtra Assembly Election Result 
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले.

Dhanshri Shintre

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरुवात झाली. सुरुवात पोस्टल मतमोजणीपासून झाली.त्यानंतर प्राथमिक कल हाती येऊ लागले.

सध्या महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात तीन दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार सध्या राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघामधून काँग्रेसचे विजय वड्डेटीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे अशी लढत होती. या मतदारसंघातून विजय वड्डेटीवर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलात पाहायला मिळाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांच्यात लढत होती. या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. दरम्यान, कराड दक्षिणमध्येही काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले आमनेसामने आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत.

सुरुवातीच्या कलात 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीमध्ये, भाजप व्यतिरिक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेना आणि उपमुख्यमंत्री शरद पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आहे, तर काँग्रेस आघाडीत आहे. महाविकास आघाडी, शरद पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात शिवसेनेचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा मोठ्या पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT