Maharashtra Election Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

Mahayuti And Mahavikas Aghadi: राज्यातील १०० मतदारसंघामध्ये काटें की टक्कर होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये महायुती जिंकणार की महाविकास आघाडी वाचा सविस्तर...

Priya More

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे राज्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे. निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही मिनिटं शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली आहे. राज्यात महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची सत्ता येणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल.

राज्यातील १०० मतदारसंघामध्ये काटें की टक्कर होणार आहे. या मतदारसंघामध्ये कोणीही जिंकू पण विजयांचे मार्जिंन हे ५ हजार ते १० हजारांच्या आतमध्ये असेल. या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना ताकद पणाला लावली होती. अगदी अनेक मोठे राजकीय नेते मंडळींपासून सिनेकलारांच्या देखील सभा झाल्या. महत्वाचे म्हणजे या मतदारसंघामध्ये चित्र पटेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या ठिकाणी नेमकं काय होईल हे जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला लागली आहे.

पश्चिम महाराष्ट्र -

महाविकास आघाडीची सत्ता यावी आणि जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या जोरदार प्रचारसभा झाल्या. या मतदारसंघामध्ये मविआच येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या मतदारसंघामध्ये बंडखोरीचे प्रमाण कमी आहे. त्याचसोबत शरद पवारांबाबत सहानुभूती पाहायला मिळाली.

कोकण -

कोकणामध्ये महायुतीला आपली सत्ता कायम ठेवण्यात यश येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची जादू चालणार नाही. आधीपासूनच या मतदरासघांतील महायुतीच्या ताकदवान नेत्यांनी जोरदार फिल्डिंग टाइट केली होती. त्यामुळे उमेदवारांना याचा आता चांगला फायदा होईल. महत्वाचे म्हणजे प्रचार देखील दणक्यात झाला होता.

विदर्भ -

विदर्भात तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तगडी लढत झाली. भाजपची सत्ता राहिलेल्या या विभागामध्ये तर लोकसभेला भाजपला मोठा धक्का बसला होता. आता तर याठिकाणी ६२ पैकी २० ठिकाणी काटें की टक्कर झाली. त्यामुळे या ठिकाणी काहीही होऊ शकते. याठिकाणी यावेळी चित्र बदलू शकते कारण याठिकाणी बंडखोरी मोठ्याप्रमाणात झाली.

मुंबई -

मुंबईमध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होऊ शकतात. तर काही मतदारसंघ सोडले तर इतर ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार पुन्हा विजयी होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे वरळी मतदारसंघामध्ये सर्वच पक्षांची फिल्डिंग टाइट केली होती. पण याठिकाणी आदित्य ठाकरेच विजयी होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा -

मराठवाडयामध्ये जरांगेट पाटील फॅक्टर जोरदार चालू शकतो. याठिकाणच्या अनेक मतदारसंघामध्ये ओबीसी विरोधात मराठा उमेदवार उभे राहिले आहेत. २० मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत झाली. त्यामुळे याठिकाणी कोणाचाही विजय होण्याची शक्यता आहे. याठिकाणी जरांगे फॅक्टर किती चालेल हे अवघ्या काही तासांत चित्र स्पष्ट होईल.

उत्तर महाराष्ट्र -

उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पारडं जड आहे. पण याठिकाणच्या अनेक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग टाइट केली आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांच्या या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचारसभा झाल्या होत्या. त्याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचे ताजे अपडेट इथं वाचा...

Maharashtra All Constituency Assembly Election results Updates

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT