Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

EVM मुळे पराभव झाला, मग सिद्ध करा; अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज

Ajit Pawar : अजित पवारांनी विरोधकांना आव्हान दिलंय. ईव्हीएममुळे महायुतीला मोठा विजय मिळालाय असा आरोप मविआकडून केला जात आहे.

Bharat Jadhav

ईव्हीएममध्ये कोणताच दोष नाहीये. बाबा आढाव यांनाही आपण तेच सांगितलं. पण विरोधक वेगवेगळं कारणं काढत आहे. जर ईव्हीएमुळे पराभव झाला असेल तर त्यांनी सिद्ध करावं असं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना दिलंय. बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आव्हान दिलंय.

लोकसभेत महाविकास आघाडीला भरघोस मते मिळाली होती. परंतु विधानसभेत मविआला सपाटून मार खावा लागला. जनतेने महायुतीला कौल दिला. पण हा जनतेचा कौल नाही तर ईव्हीएममुळे महायुतीचा विजय झाला असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. ईव्हीएम बंद करत बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन उभारले जात आहे. बाबा आढाव यांनी ईव्हीएमविरोधात पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केलं. आज अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. ईव्हीएममध्ये दोष नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

विधानसभेचा निकाल वेगळा लागला असता तर मविआच्या नेत्यांनी मोठा जल्लोष केला असता. परंतु त्यांनी एकी दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जनतेने त्यांच्याऐवजी आमच्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे, असा निकाल लागला. परंतु ते आता ईव्हीएमवर आरोप करत आहेत. दरम्यान ईव्हीएमविरोधात मविआच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

तसेच न्यायालयाने त्यांची तक्रार सुद्धा घेतली आणि गुन्हाही दाखल करून घेण्यास न्यायालयाने नकार दिला. यावरून मविआचे नेते सुप्रीम कोर्टाचं देखील ऐकण्यास तयार नाहीत. जर ईव्हीएममध्ये घोटाळा आहे तर त्यांनी ते सिद्ध करून दाखावावे. ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे. ते सुद्धा विरोधक सांगत नाहीत, त्यामुळे हा त्यांचा रडीचा डाव आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा दारूण पराभव झालाय. त्या पराभवाचा खापर ते आता ईव्हीएमवर फोडत आहेत, असं अजित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT