Vasai Constituency 
महाराष्ट्र

Vasai Exit Poll: वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर होणार आमदार? पाहा Exit Poll

Vasai Vidhansabha Election Exit Poll Result: वसई मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. वसई मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी हितेंद्र ठाकूर यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर याठिकाणी निवडून येऊ शकतात.

वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वसई विधानसभेचे संभाव्य आमदार हे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद् भाजपचे स्नेहा दुबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

वसई विधानसभा मतदारसंघातील मतदान बुधवारी पार पडलं. याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत असल्याचे चित्र दिसून आले. गेल्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी २५ हजार ९९५ मतांची आघाडी मिळाली होती आणि समोर असलेले उमेदवार जे शिवसेनेमध्ये होते ते विजय पाटील यांचा पराभव झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT