Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Vidhan Sabha: अजित पवार गटाला सर्वात मोठं खिंडार, हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; कारण काय?

Ajit Pawar News : ऐन विधानसबाह निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हजारो कार्यकर्त्याने पक्ष सोडला आहे. यामागचं नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊ...

दिलीप कांबळे

ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाने सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आता त्यांच्याविरोधात मोठी नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटातून इच्छुक असलेले बापू भेगडे यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

याबाबत घोषणा केल्यानंतर बापू भेगडे यांनी घड्याळाला नमस्कार करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रामराम केला. त्यामुळे आता अजित पवार यांना मावळ तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे, अशी लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पाथरी विधानसभेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादी अजीत पवार गटात मोठी घडामोड सुरू झाली आहे. पाथरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाने आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बंड पुकारलं आहे.

पाथरीची जागा शिवसेनेची हक्काची असतानाही राष्ट्रवादीकडे गेल्याने सईद खान यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सईद खान यांना कार्यकर्त्यां मेळाव्या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भाषणा दरम्यान, त्यांना अक्षरशः रडू कोसळले.

त्यांनी 29 सप्टेंबरला मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केलीय. आमदार राजेश विटेकर यांनी माझं राजकारण संपवण्याचा घाट घातल्याच सईद खान यांनी आरोप केलाय. त्यामुळे पाथरी विधानसभेत पुढील काळात मोठ्या घडामोडी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT