Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेसाठी ठाकरेंची नवी रणनीती? देणार मुस्लिम उमेदवार? जाणून घ्या नेमका काय आहे प्लॅन

Uddhav Thackeray News In Marathi: ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू असते. त्यातच आता ठाकरे गटाने मुस्लिमांना उमेदवारी देण्याविषयी भाष्य केल्याने नवा राजकीय वाद सुरु झालाय.

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Assembly Election 2024 News in Marathi: हिंदुत्वावरून भाजप-शिंदे गट आणि ठाकरे गटात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यात लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांमुळे ठाकरेंचे उमेदवार विजयी झाल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटानं वारंवार केला. मात्र ठाकरेंनी कधीही या आरोपांचं खंडन केलं नाही. उलट आता ठाकरे गटानं विधानसभेसाठी मुस्लिम मतांसाठी नवी रणनीतीच आखलीय.

विधानसभा निवडणूकीत मुस्लिमांना उमेदवारी देण्याविषयी ठाकरे गटाने थेट भूमिका घेतलीय...जर उमेदवारात निवडून येण्याची क्षमता असेल तर धर्मावरून उमेदवारी नाकारणार नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी जाहीर केलंय.

यातच हिंदुत्ववादी ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार देण्याचं जाहीर केलं आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी ठाकरे गटाच्या भूमिकेचं स्वागतही केलंय. याचबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ''शिवसेनेची भूमिका लोकशाहीला मानणारी.'' तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''भागवतही आमच्या विचाराची लाईन घेतील.''

2019 मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंनी मुस्लिम धार्जिणी भूमिका घेतल्याची टीका भाजपकडून केली जाते. त्यातच आता लोकसभेला अल्पसंख्यांकांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं.

त्यानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सॉफ्ट करत मुस्लिम उमेदवार देण्याची चाचपणी सुरु केलीय. मात्र ठाकरेंची नवी रणनीती मतदारांना भावनार की या रणनीतीचा फटका बसणार? हे विधानसभेनंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT