Satara Constituency 
महाराष्ट्र

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Satara Constituency: सातारा मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि अमित कदम यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. सातारा मतदारसंघातून भाजपचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी शिवेंद्रराजे भोसले यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी निवडून येऊ शकतात.

सातारा विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. भाजपच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सातारा विधानसभेचे संभाव्य आमदार हे भाजपचे शिवेंद्रराजे भोसले असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद् शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे भोसले विरुद्ध अमित कदम अशी लढत पाहायला मिळतेय. शिवेंद्रराजे हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. तर अमित कदम हे शिवसेना ठाकरे गटाकडून ही निवडणूक लढत आहेत. अमित कदम हे अतिशय नवका उमेदवार आहेत. त्याच्या आधी ते अजित पवार गटामध्ये होते. त्यानंतर तिथून उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि ही उमेदवारी घेतली.

दरम्यान, आता या मतदारसंघातील परिस्थिती पाहता शिवेंद्रराजे ही निवडणूक जिंकणार असल्याचे चर्चा या मतदारसंघामध्ये सुरु आहे. ही निवडणूक ते आता मताधिक्य मिळवण्यासाठी लढत आहेत अशा प्रकारची चर्चा शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. महारा्ष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा मताधिक्यांनी शिवेंद्रराजे निवडून येतील हे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT