Washim Constituency 
महाराष्ट्र

Exit Poll Maharashtra : वाशिम मतदारसंघातून सिद्धार्थ देवळे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Washim Vidhansabha Election SAAM Exit Poll Result: वाशिम मतदारसंघामध्ये सिद्धार्थ देवळे आणि श्याम खोडे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात काल २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. वाशिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी सिद्धार्थ देवळे यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ देवळे याठिकाणी निवडून येऊ शकतात.

वाशिम मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून सिद्धार्थ देवळे निवडणूक लढत आहेत. तर भाजपाकडून श्याम खोडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, सिद्धार्थ देवळे हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर श्याम खोडे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाला वाशीमचं गड राखण्यात यश आलं असं म्हणता येईल. श्याम खोडे त्यांना भाजपाकडून त्यांना आव्हान देत होते. पण वाशिममध्ये सिद्धार्थ देवळे या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने आपल्याकडे सर्व वाशिम मतदारसंघ जो आहे तो खेचून घेतला आहे. संभाव्य आमदार म्हणून सिद्धार्थ देवळे यांना वाशिमकरांनी पसंती दिली. ठाकरे गटाने आघाड्यावर मात केलेली आहे.

वाशिम विधानसभा मतदारसंघाती निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी दिली होती आणि महायुतीने भारतीय जनता पक्षाचे श्याम खोडे यांना उमेदवारी दिली होती. अतिशय चुरशीची लढत झालेल्या या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील जे मागासवर्गीय मतदार आहेत किंवा जे शेतकरी आहेत यांनी डॉ. सिद्धार्थ देवळे यांना साथ दिल्याची चित्र सध्या तरी समोर येत आहेत. मात्र आता डॉ. सिद्धार्थ देवळे यांचं पारडं जड असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

SCROLL FOR NEXT